Eco friendly bappa Competition
घर thane क्षयरोग मुक्तीसाठी 75 ग्रामपंचायतींची निवड

क्षयरोग मुक्तीसाठी 75 ग्रामपंचायतींची निवड

Subscribe

केंद्र शासनाने 2025 पर्यंत राज्य क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण अनुषंगाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत उपक्रम राबविण्यात येत आहे. टीबी मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी ग्रामीण भागातील 75 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 121 गावांचा समावेश असून 1 लाख 09 हजार 380 लोकसंख्येचा समाविष्ट करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली टीबी मुक्त ग्रामपंचायत उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात क्षयरुग्णांचे शोध घेण्यात येणार आहे तसेच जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. याकरिता ठाणे जिल्ह्यात सर्व तालुक्यातील गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, समुदाय आरोग्य अधिकारी, आशाताई अंगणवाडी यांचा रुग्ण सहाय्यता समूह तयार करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये टीबी मुक्त ग्रामपंचायती करिता क्षय रोगाचे निकष पूर्ण केल्यास ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

स्पर्धेत सहभागी ग्रामपंचायतींना डिसेंबर 2023 पर्यंत 1000 लोकसंख्येमध्ये कमीत कमी 30 टीबी संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची थुंकी नमुन्याची तपासणी करायची आहे. त्यामध्ये एक किंवा कमी (निरंक) रुग्ण आढळल्यास ग्रामपंचायत पात्र ठरेल. क्षयरोग दूर करण्यासाठी पंचायतींमध्ये स्पर्धा निर्माण करणे आणि त्यांच्या योगदानाचे सार्वजनिकरित्या कौतुक करणे असे या उपक्रमाचे उद्देश आहे. या उपक्रमाला उंचावर घेऊन जाण्यासाठी ग्रामपंचायतींना क्षयरोग अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी भेटी देऊन जनजागृती निर्माण करीत आहे. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गिता काकडे यांनी सांगितले. ग्रामपंचायत स्तरावरील निधी क्षयरोग जनजागृती व इतर उपाययोजनांकरिता वापरण्याचे सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी दिलेल्या आहेत. या स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबी मुक्त असल्यास कास्यपदक, दुसर्‍या वर्षी टीबी मुक्त असल्यास रजत आणि तिसर्‍या वर्षी टीबी मुक्त राहिल्यास सुवर्णपदक देण्यात येईल. असे म्हटले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -