घरमुंबईविरोधकांनी आधी त्यांचे घर बघावे - मुख्यमंत्री

विरोधकांनी आधी त्यांचे घर बघावे – मुख्यमंत्री

Subscribe

आम्ही काय खेळ खळतो यापेक्षा विरोधकांचा काय खेळ होणार आहे, याकडे त्यांनी बघावे, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.

आम्ही काय खेळ खळतो यापेक्षा विरोधकांचा काय खेळ होणार आहे याकडे त्यांनी बघावे, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ईडीच्या भीतीमुळे शिवसेनेने युती केली, अशी टीका विरोधकांनी केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच विरोधकांनी आम्ही काय करतो यापेक्षा स्वतःचे घर बघावे, आमचं घर व्यवस्थित आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावला. दरम्यान, विरोधकांनी चहापाणी कार्यक्रम नाकारला आहे. यावर देखील मुख्यमंत्र्यांनी टीका केली. चहापान हे काही सेलिब्रेशन नाही तर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन चर्चा करावी हा यामागचा उद्देश असतो, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवारी

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अधिवेशनाआधी आज विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन चहापानाच्या निमंत्रणावर बहिष्कार टाकला. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांनी सांगितले होते. विरोधकांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. या पत्रकार परिषदेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, महादेव जानकर, शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. २७ तारखेला वित्तमंत्री अर्थसंकल्प मांडणार आहेत. हे अर्थसंकल्पिय अधिवेशन असले तरी संपूर्ण अर्थसंकल्प अधिवेशनात मांडल जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

अधिवेशनात ११ विधेयके मांडणार 

या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ११ विधेयक मांडली जाणार असून, कामकाजाचे नियोजन पाहून जेवढी विधेयके मान्य करता येतील तेवढी मान्य करू असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच या अर्थसंकल्पात सपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नसून, २७ तारीखला वित्तमंत्री आपला अर्थसंकल्प मांडतील असे देखील त्यांनी सांगितले. तसेच या अधिवेशनात एक दिवस दुष्काळावर चर्चा होणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पुलवामामध्ये राज्यातले दोन जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांचा निधी दिला. या दोन्ही कुटुंबांना नोकरी देण्याचा निर्णय देखील घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितला. तसेच दुष्काळासाठी केंद्र सरकारने ४७०० कोटी दिल्याचे देखील त्यांनी सांगितले. एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये ५१ लाख शेतकऱ्यांची खाती पात्र केली असून, ४४ लाख खात्यांमध्ये १८ हजार कोटी जमा केल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -