घरदेश-विदेशबांगलादेशातील विमान हायजॅकचा डाव फसला

बांगलादेशातील विमान हायजॅकचा डाव फसला

Subscribe

बांगलादेशात एक विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चत्तोग्राम येथील शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ढाकाहून दुबईला जाणारे विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी हायजॅक करणाऱ्या व्यक्तीने विमानातच गोळीबार केला. मात्र, त्याला प्रत्युत्तर देत सुरक्षा रक्षकांनी विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. तसेच, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या गोळीबारात विमानातील क्रू मेंबर एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानातील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून सर्व ठिकाणच्या विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेत वाढ केल्याची माहिती समोर येत आहे. येथील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी बांगलादेशातील एका खासदारासह अनेक प्रवासी विमानातून प्रवास करत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -