घरमुंबईमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांची भेट, पण नेमकी चर्चा...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटांची भेट, पण नेमकी चर्चा काय?

Subscribe

जी कामं ठाकरे सरकार सत्तेत असताना शेवटच्या काळात घाईत मंजूर झाली होती त्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसवा आणि जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली. रतन टाटा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले, की रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांची तब्येत ठीक आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना निर्णयांच्या स्थगिती संदर्भात विचारण्यात आले असता ते म्हणाले, जी कामं ठाकरे सरकार सत्तेत असताना शेवटच्या काळात घाईत मंजूर झाली होती त्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा – आपल्या देशात सध्या लोकशाही संपून हुकूमशाही आली, असे मी म्हणणार नाही, पण…

- Advertisement -

मात्र जी अत्यावश्यक कामं आहेत त्यांना स्थगिती नाही. सरकार बदललं म्हणून कोणतीच लोकविकासाची कामं आहेत ती रद्द होणार नाहीत.त्याचबरोबर जी कामं अत्यावश्यक आहेत ती कामं रद्द होणार नाहीत. चुकीच्या पद्धतीने जी कामं झाली त्यावर मात्र नक्कीच विचार केला जाईल. घाईघाईने जी कामं केली आहेत त्यांना स्थगिती दिली आहे. यात अधिकाऱ्यांचा काहीही प्रश्न नाही, माझी त्यांच्याशी बैठक झाली आहे. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा – पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत सर्वंकष धोरण तयार करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल रतन टाटा यांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देत मनापासून अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाच्या पुढील कारकिर्दीसाठी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल विचारण्यात आले तेव्हा ‘त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत’ असं म्हणत एकनाथ शिंदेनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.

हे ही वाचा – कोणतेही वादळ आले तरी कांदळवनासारखे सरकार मजबूत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -