घरताज्या घडामोडीठाकरे - पवार झारीतील शुक्राचार्य

ठाकरे – पवार झारीतील शुक्राचार्य

Subscribe

चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप ; मविआ सरकारला ओबीसींना न्याय द्यायचा नव्हता

नाशिक । महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेते आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने करत होते. अर्थात भुजबळ, वडडेटटीवार यांना आरक्षण देण्याची कितीही इच्छा असली तरी ओबीसी आरक्षण द्यायचेच नाही असे महाविकास आघाडी सरकारचे आधीच ठरले होते. मविआ सरकारला न्याय द्यायचा नव्हता याकरीता निरगुडे आयोगाला साडेचारशे कोटी रूपयांचा निधीही नाकारला. त्यामुळे मविआ सरकारमधे असलेल्या झारीतल्या शुक्राचार्यांनी आरक्षण अडवले असा आरोप करत भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले.

नाशिक येथे भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार बावनकुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारमुळेच ओबीसी आरक्षण मिळाल्याचा दावा केला. यावेळी बावनकुळे यांनी मविआ सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत चालढकल केल्याचे सांगत तत्कालीन सरकारवर आरोप केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे व अजित पवार यांच्यामुळे अडीच वर्षे आरक्षण लांबले. ठाकरे-पवार सरकार असते तर त्यांनी बांठिया आयोगाचा अहवाल सादर नसता केला. हा अहवाल दडपून ठेवला असता. ओबीसींशिवाय निवडणुका घेउन स्थानिक स्वराज्य संस्थांवर ताबा घ्यायचा अन २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण देउन समाजाची सहनुभुती मिळवायची हा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

- Advertisement -

आरक्षणाचा डेटा गोळा करण्यासाठी निरगुडे आयोग स्थापन केला गेला मात्र तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोगाने मागणी केलेला ४३५ कोटींचा निधी देण्यास नकार देत आयोगच रदद केला. शिंदे-फडणवीस सरकारने नियुक्त वकिलांनी ओबीसींची बाजू योग्य पध्दतीने मांडली, म्हणून आरक्षण मिळाले. थोडक्यात काय तर कुठल्याही परिस्थितीत ओबीसींना न्याय मिळू नये आणि त्यांना आरक्षण द्यायला, लागू नये अशीच महाविकास आघाडी सरकारची मानसिकता होती. असेही बावनकुळेंनी म्हटले.

भुजबळांशी कधीही समोरासमोर यायला तयार
यावेळी आ. बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि विजय वडेटटीवार यांच्यावरही टिका केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समर्थकाने आरक्षणाविरोधात नागपुर खंडपीठात याचिका दाखल केली. भुजबळांनी याचिकाकर्ते कोण होते सांगावे. जेव्हा सत्ता होती तेव्हा फक्त मोर्चे आंदोलने केली. भुजबळ, वडडेटीवार समता परिषदेच्या नावाने केवळ ढोंग करत राहीले. मी अनेकदा या दोघाही नेत्यांची भेट घेतली. भुजबळांनी सांगाव अडीच वर्षात त्यांनी कधी सॉलिसिटर जनरलची भेट घेतली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भुजबळांना जरी आरक्षण द्यायचे होते पण त्यांच्या नेत्यांच्या मनात नव्हते. मी कधीही याविषयावर भुजबळांसमोर यायला तयार आहे असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

काय म्हणाले बावनकुळे…
* ओबीसी आरक्षण देण्याची मविआची मानसिकताच नव्हती
* सत्तेत असूनही ओबीसी मंत्र्यांनी केवळ मोर्च, आंदोलने केली
* काँग्रेसनेच ओबीसी आरक्षणात खोडा घातला.
* निरगुडे आयोगाला निधी देण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला
* आरक्षणाचे श्रेय मविआ सरकार घेत असेल या अहवालातील चुकांची जबाबदारीही घ्यावी.
* ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊन संस्था ताब्यात घेण्याचा होता डाव
* उध्दव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
* ठाकरेंनी आता राऊतांच्या ट्रॅपमधून बाहेर यावे
* ठाकरेंनी आता अधिक हसू करून न घेता आत्मचिंतन करावे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -