घरमहाराष्ट्रआपल्या देशात सध्या लोकशाही संपून हुकूमशाही आली, असे मी म्हणणार नाही, पण...

आपल्या देशात सध्या लोकशाही संपून हुकूमशाही आली, असे मी म्हणणार नाही, पण…

Subscribe

आज उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. या भागात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या अनेक आक्षेपांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनी दडपशाहीविरोधात एकत्र येण्यासाठी काय कलेल पाहिजे या प्रश्नाचे उत्तर दिले.

उद्धव ठाकरे विरोधी पक्षांवर काय म्हणाले –

- Advertisement -

यावेळी खासदार संजय राऊत यांनी या दडपशाहीविरोधात एकत्र येण्यासाठी विरोधी पक्षांनी काय केले पाहिजे?, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, पहिली म्हणजे सर्वांना इच्छा असली पाहिजे. आणीबाणीच्या काळात लोकांनी तो अनुभव घेतला. जनता पक्ष स्थापन झाला होता. तुम्ही म्हणता ना, जनता काय करते? तर, त्यावेळी आपण लहान होतो. 75-77 च्या काळातली गोष्ट. जनता पक्षाकडे प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिंग एजंट पण नव्हते. तरीसुद्धा लोकांनी भरभरून मतं दिली. सर्व स्तरांतील लोपं, मग साहित्यिक असतील, विचारवंत असतील, त्यांनी बाहेर पडून आवाज उठवला होता. जनता पक्ष सत्तेवर आला. मात्र नंतर आपापसात भांडून स्वतःचे सरकार स्वतःच पाडून टाकले. त्याच्यामुळे एक इच्छाशक्ती पाहिजे. की समजा, जर एकत्र यायचं झालं तर कोणीही पदावरून भांडणार नाही. आपल्या देशात सध्या लोकशाही संपून हुकूमशाही आली असे मी म्हणणार नाही. पण ज्या दिशेने पावलं पडताहेत ती पाहता अनेक जणांचं मत आहे की, ही पावलं, ही लक्षणं काही बरी नाहीयत. चुकीच्या दिशेने पडताहेत, असेच अनेकांचे मत आहे, असे उत्तर दिले.

शरद पवारांविषयीच्या आक्षेपावर उद्धव ठाकरेंचे उत्तर –

- Advertisement -

यावेळी संजय राऊत यांनी फुटिरांचा असाही एक आक्षेप आहे की, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली…, असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर बरं, आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक… गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे, आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमपं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणे शोधताय, असे उत्तर दिले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -