घरमहाराष्ट्रNilesh Rane : बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी...; नीलेश राणेंनी सांगितली 'ती' आठवण

Nilesh Rane : बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी…; नीलेश राणेंनी सांगितली ‘ती’ आठवण

Subscribe

यावेळी बोलताना माजी खासदार नीलेश राणे म्हणाले की, आज सभा घेण्याची काही गरज नव्हती. परंतु उद्धव ठाकरे कोकणमध्ये आले होते. कणकवलीमध्ये त्यांची सभा पार पडली. त्या सभेत भास्कर जाधव नावाच्या लांडोराने आमचे नेते नारायण राणे यांच्यावर टीका केली.

गुहागर (चिपळून) : कोकणातील राजकारणात आजचा दिवस म्हणजे राणेविरुद्ध जाधव असा बघायला मिळाला. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी नीलेश राणे यांची गुहागरमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नीलेश राणे यांनी बाळासाहेबांच्या शब्दासाठी नारायण राणेंनी घर गहाण ठेवल्याची एक आठवण सांगत बाळासाहेबांवरील राणेंचं प्रेम किती होतं हे सांगतिलं. तसेच बाळासाहेबांचे निधन झाले त्यावेळी दादा (नारायण राणे) कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते, ते जेवलेसुद्धा नाहीत अशीही आठवण त्यांनी यावेळी सांगितली. (Nilesh Rane For one word of Balasaheb Nilesh Rane told that memory)

यावेळी बोलताना माजी खासदार नीलेश राणे म्हणाले की, आज सभा घेण्याची काही गरज नव्हती. परंतु उद्धव ठाकरे कोकणमध्ये आले होते. कणकवलीमध्ये त्यांची सभा पार पडली. त्या सभेत भास्कर जाधव नावाच्या लांडोराने आमचे नेते नारायण राणे यांच्यावर टीका केली. आता त्याची काही खैर नाही. आज सभेसाठी येण्याआधी जे घडलं ते आवडलं आपल्याला. पण ही सभा घेण्यामागचा उद्देश म्हणजे उद्धव ठाकरे कोकणात आले होते. तेव्हा भास्कर जाधव हा नको नको ते बोलला. आम्हाला काहीही बोला, पण नारायण राणेंवर बोलेलं आम्हाला आवडत नाही. तिकडे नाशिकमध्येही नारायण राणेंवर टीका. शिवाजी पार्कमध्ये तेच. परवा कणकवलीला आला तेथेही टीका केली.

- Advertisement -

गुहागर मतदार संघाची एक उंची आहे. अनेक आमदारांनी या मतदारसंघाने केलं. परंतु भास्कर जाधवांनी ते नाव कमी केलं. काम जर चांगली केली असती तर आजची दगडं पडले नसते. भास्कर जाधव तू आमच्या शेपटीवर पाय ठेवलास. तुला सोडणार नाही. अनेक दिवसांपासून तुला ऐकतो. या भिकारचोटाला कुणी मातोश्रीमध्ये घेतला नसता. साला बिस्कीट चोर. कुणाला हुशारी शिकवतो. आम्ही ठाकरेंना नाही घाबलो, पवारांनाही नाही घाबरलो, आम्ही मुंबईत राहतो. भाईगिरीचं सर्टीफिकेट मुंबईतून मिळतं. तू काय सांगतो आम्हाला अशा शब्दांत माजी खासदार नीलेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, पोपटी रंगाचं टी-शर्ट घातलं होतं. पोलिसांच्या, महिलांच्या गराडाच्या मागे लपला. दगडं मारली त्याच्या बदल्यात काय पाठवतो त्याचा विचारही करणार नाही असाही इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला.

नीलेश राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा समाचार घेतल्यानंतर माजी खासदार नीलेश राणे म्हणाले की, जाहीर सभेत सांगतो की, मला बाळासाहेबांनी बोलावलं आणि विचारलं की, नाराण राणेंना मी काय दिलं नाही. बाळासाहेबांचे एवढे वाईट दिवस कधीच आले नव्हते की तुला (भास्कर जाधव) जवळ बोलावतील. नारायण राणेंनी जेवढं बाळासाहेंबावर प्रेम केलं ना त्याच्या 25 टक्केही प्रेम जाधव यांनी केलं नसेल. याचवेळी नीलेश यांनी बाळासाहेब आणि नारायण राणेंची एक आठवण सांगितली.

- Advertisement -

हेही वाचा : Guhagar : निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक; बावनकुळेंनी काढले भास्कर जाधवांचे संस्कार

त्यावेळी बाळासाहेंब म्हणाले होते की, नारायण हे काँग्रेसचं सरकार आपल्याला पाडायचं. हे सरकार पाडलं गेलं पाहिजे. त्यावेळी नारायण राणेंनी बाळासाहेबांना शब्द दिला की, हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा नारायण राणे यांच्याकडे पैसा नव्हता. फक्त कार्यकर्त्यांची फौज होती. 25 ते 30 आमदार घेऊन मातोश्री क्लबवर ठेवलं. विरोधी पक्षनेते असताना नारायण राणेंनी स्वतःचं घर गहाण ठेवलं. हे करु शकते का भास्कर जाधव. माझ्या आईने विचारलं की, आपण राहायचं कुठे? तर नारायण राणे म्हणाले मी बाळासाहेबांना शब्द दिला आहे. योगायोगाने ते सरकार टिकलं नाही. पण नारायण राणे गेले नाहीत बाळासाहेबांकडे मदत मागायला.

हेही वाचा : Mitkari on Awhad : चळवळीच्या नावाखाली वळवळ करणाऱ्या आव्हाडांनी…; मिटकरींचं आव्हाडांना प्रत्युत्तर

नारायण राणेंनी स्वतःला सिद्ध केलं. शरद पवार वगैरे हे कसले नेते. त्यांना सगळं आयतं मिळालं. पण एक रुपयांपासून नोकरी करुन हे सगळं नारायण राणेंनी उभारलं. जेव्हा बाळासाहेब गेले तेव्हा नारायण राणे जेवले नाहीत. अख्खं कुटुंब रडलं. अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -