घरमुंबई'सरकारच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळग्रस्तावर भीक मागण्याची वेळ'

‘सरकारच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळग्रस्तावर भीक मागण्याची वेळ’

Subscribe

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस पक्षानेही पुढाकार घेतला असून लवकरच ते दुष्काळी दौऱ्यावर जाणार आहेत. १२ ते २० मे दरम्यान काँग्रेसच्या २० जणांची टीम दुष्काळी भागात जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

राज्यात सध्या भीषण दुष्काळ असून, राज्य सरकार या दुष्काळाबाबत गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यातच राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळग्रस्तांना स्थलांतरीत व्हावे लागत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी करत दुष्काळग्रस्तावर भीक मागण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी भागाची माहिती घेण्यासाठी मुंबईतल्या टिळक भवन येथे अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. दरम्यान १२ ते २० मे दरम्यान काँग्रेसची २० जणांची टीम दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट शिवाय पालकमंत्री जिल्ह्यात फिरलेच नाही. त्यामुळे आता याना ही धावपळ करावी लागत असल्याचा आरोप देखील अशोक चव्हाण यांनी यावेळी केला आहे.

- Advertisement -

सरकार निवडणुकामध्ये व्यस्त 

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा दुष्काळ परिस्थिती गंभीर आहे. मात्र निवडणुकीमध्ये सर्व दुष्काळी भागाना सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप देखील अशोक चव्हाण यांनी यावेळी केला. १६ हजार गावे दुष्काळ मुक्त झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच ९ हजार गावे दुष्काळ मुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे देखील पंतप्रधान म्हणाले होते. मग महाराष्ट्रामध्ये दुष्काळ का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलाय.
राज्य सरकारला दुष्काळाचे काहीही पडलेले नाही फक्त केवळ कागदावर नियोजन करण्यात आल्याचा आरोप करत ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये सरकारने दुष्काळाबाबत नियोजन करणे गरजेचे होते. मात्र आता आचारसंहितेचे कारण सरकार पुढे करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

दुष्काळावर सरकार गंभीर नाही

९६ लाख मोठी, ३७ लाख छोटी जनावरे आहेत. त्यांपैकी ९ लाख म्हणजे १० टक्के जनावरांची सोय झाल्याचे अशोक चव्हाण यांनी संगितले. पत्रकार परिषद घेऊन केवळ दिखावा करण्याचे काम सरकारने केले. सरकारने दुष्काळाबाबत अंमलबजावणी केली नाही. तसेच पालकमंत्र्यांनी त्या त्यावेळी बैठक घ्यायला हव्या होत्या. मात्र तसे काही झाले नाही. पावसाचे प्रमाण कमी पाहता सरकारने नियोजन करायला हवे होते असे देखील चव्हाण म्हणालेत. खरिप कर्ज वाटप बँकेची जबादारी आहे असे सुभाष देशमुख सांगत आहेत. मात्र अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याचे अशोक चव्हाण म्हणालेत. दरम्यान दुष्काळबाबत काँग्रेस राज्यपापांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -