घरताज्या घडामोडीकेईएममधील रोजंदारीवरील कामगारांचा असहकार; आंदोलनाचा इशारा

केईएममधील रोजंदारीवरील कामगारांचा असहकार; आंदोलनाचा इशारा

Subscribe

कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात केईएम अधिष्ठात्यांशी पत्रव्यवहार करूनही त्यांनी दखल न घेतल्याने येत्या बुधवारी त्यांनी असहकार पुकारुन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

केईएम रुग्णालयात कोरोना कोविड १९चा कक्ष तयार करण्यात आलेला असून याठिकाणी काम करणाऱ्या रोजंदारीवरील तसेच बहुउद्देशीय कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात केईएम अधिष्ठात्यांशी पत्रव्यवहार करूनही त्यांनी दखल न घेतल्याने येत्या बुधवारी त्यांनी असहकार पुकारुन आंदोलनाचा इशारा दिला आहे. दि म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली हे असहकार आंदोलन पुकारले जाणार असून यामुळे वैद्यकीय सेवा कोलमडून पडल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिला आहे.

असहकार पुकारत प्रशासनाला देणार दणका

केईएम रुग्णालयातील रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगारांन मासिक वेतन वेळेत देण्यात यावे, तसेच दररोज ३०० रुपयांचा जोखीम भत्ता देण्यात यावा. कोविड कक्षावर कर्तव्य बजावणाऱ्या कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच सर्व कामगार, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांना निवेदन दिले आहे. परंतु, त्या पत्रांची अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. नियमित कामगारांना जोखीम भत्यांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, रोजंदारी आणि बहुउद्देशीय कामगारांना ही रक्कम देण्यत आली नाही. आज कोविडच्या कक्षात जीवाची पर्वा न करता हे कामगार काम करत असून प्रामाणिक कर्तव्य बजावूनही त्यांच्या अडचणींवर मात केली जात नाही. त्यामुळे प्रशासनाशी असहकार पुकारण्याचा निर्धार आम्ही केला असून येत्या बुधवारी २० मे रोजी हा असहकार पुकारुन प्रशासनाला कामगारांची ताकद दाखवून दिली जाणार असल्याचे बने यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जेवणाअभावी १६५० नागरिकांवर उपासमारीची वेळ; पवई क्वारंटाईन सेंटरमधील प्रकार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -