घरताज्या घडामोडीनाशिक @ 796; मालेगावात ७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक @ 796; मालेगावात ७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

Subscribe

नाशिक जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये दोन मनमाड, निफाड, नांदुर शिंगोटे व कसबे सुकेणे येथील प्रत्येकी एक आणि उर्वरित सात रुग्ण मालेगावचे रहिवासी आहेत. जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ७९१ झाली आहे. एकट्या मालेगाव शहरातील बाधित रुग्णांची संख्या ६१७ आहे. दरम्यान, मालेगावात पुन्हा नऊ मृत्यूंची नोंद झाली असून, जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ४२ झाली आहे. त्यापैकी ४० मृत रुग्ण मालेगाव व उर्वरित दोन नाशिक शहरातील आहेत.

मालेगावसह नाशिक जिल्ह्यात पुर्वी शंभरमध्ये दोन अंकीपेक्षा अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत होते. ते प्रमाण आता कमी होत चालले आहे. मालेगावात रविवारी दिवसभरात सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून मालेगावात पुन्हा नऊजणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. मृत रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल शनिवारी व रविवारी प्रशासनास प्राप्त झाले. मृत रुग्ण १२ ते १५ मे या कालावधीतील आहेत. मालेगावात ६१७ रुग्ण पॉझिटिव्ह असले तरी प्रत्यक्षात ४२८ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले असून १४९ रुग्णांवर उपचार चालू आहे. जिल्ह्यात एकूण ७९१ पॉझिटिव्ह रुग्ण असले तरी त्यापैकी ५४८ रुग्ण बरे झाले असून सध्या २०१ रुग्ण उपचार घेत आहेत.

- Advertisement -

२६८ अहवाल प्रलंबित

आरोग्य विभागातर्फे आत्तापर्यंत ७ हजार ३८१ संशयित रुग्णांच्या घशाचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी जिल्हा प्रशासनास ६ हजार ३२२ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून ७९१ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. अद्याप २६८ संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ३३, नाशिक शहरातील १२३, मालेगाव शहरातील ११२ अहवाल आहेत.

१३८ संशयित रुग्ण दाखल

रविवारी दिवसभरात करोनासदृश्य आजाराची लक्षणे आढळलेली १३८ रुग्ण उपचारार्थ रुग्णालयांमध्ये दाखल झाले. यामध्ये जिल्हा रुग्णालयात १०, नाशिक मनपा रुग्णालये ५१, डॉ.पवार वैद्यकीय महाविद्यालय ०१, मालेगाव रुग्णालये ३४, नाशिक ग्रामीण रुग्णालय येथे ४२ संशयित रुग्ण दाखल झाले.

- Advertisement -

नाशिक मनपाने हटवले चार प्रतिबंधित क्षेत्र

नाशिक शहरात ४६ बाधित रुग्ण असून ३३ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. यापैकी रुग्ण वास्तव्य करत असलेले चार प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध महापालिकेने रविवारी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने हटविले आहेत. निर्बंध हटवलेले प्रतिबंधित क्षेत्र सातपूरमधील सातपूर कॉलनी, पाथर्डी फाटा येथील मालपाणी सॅफरॉन, सिडकोतील उत्तमनगर आणि सावतानगर आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत आता २९ प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण -७९१
मालेगाव –६१७
नाशिक शहर –४६
नाशिक ग्रामीण -९८
बरे झालेले रुग्ण -५३४
मृत रुग्ण –४२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -