घरCORONA UPDATEकल्याण डोंबिवलीत आठवड्याभरात ८ मृत्यू; रुग्णसंख्या ५००वर!

कल्याण डोंबिवलीत आठवड्याभरात ८ मृत्यू; रुग्णसंख्या ५००वर!

Subscribe

कल्याण डोंबिवलीकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. डोंबिवली पश्चिमेतील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत गेल्या आठवड्याभरात आठ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११ झाला आहे. महापालिका क्षेत्रात रविवारी सर्वाधिक नवीन ४२ रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोनाबाधित रूग्णांचा आकडा आता ५०० वर पोहचला आहे.

१८० रुग्णांना मिळाला डिस्चार्ज!

कल्याण डोंबिवली शहरात करोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. एक आकडी संख्या आता दोन आकडयांवर पेाहोचली आहे. रविवारी सर्वाधिक ४२ रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे. नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील १५ रूग्ण, कल्याण पश्चिमेतील ११ रूग्ण, डोंबिवली पूर्वेत ३ रूग्ण, डोंबिवली पश्चिमेत १० तर टिटवाळा मांडा येथे ३ रूग्ण आढळून आले आहेत. ५०० रूग्णांपैकी १८० रूग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, ३०९ रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -