घरताज्या घडामोडी'या' ठिकाणी एसटीच्या फेऱ्या वाढणार; ९७५ बससह हजारो चालक दाखल

‘या’ ठिकाणी एसटीच्या फेऱ्या वाढणार; ९७५ बससह हजारो चालक दाखल

Subscribe

कोरोना या महामारीत एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन विभागातून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ने- आन करण्यासाठी एसटीच्या फेऱ्या वाढणार आहेत.

कोणत्याही संकट काळात नेहमी धावून येणारी लालपरी पुन्हा मुंबई, ठाणे आणि पालघरच्या मदतीला धावून आली आहे. कोरोना या महामारीत एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे आणि पालघर या तीन विभागातून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ने- आन करण्यासाठी विशेष फेऱ्या वाढविण्याकरिता एसटी महामंडळाने राज्यातील विविध विभागातून ९७५ एसटी बस आणि १ हजार २५० चालक दाखल होण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहेत.

९७५ बससह हजारो चालक दाखल

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लाॅकडाऊन चार जाहीर केला आहे. गेल्या दोन महिन्यापासून या लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे डाॅक्टर्स, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीचा भार एसटी महामंळावर देण्यात आला आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर विभागामार्फेत शासनाच्या आदेशानुसार विेशेष वाहतूक करण्यात येत आहे. मात्र ही वाहतूक अपुरी पडत असल्याने एसटी महामंडळाने या तिन्ही विभाग एसटीचा फेऱ्या वाढविण्यासाठी आता विविध विभागातून ९७५ एसटी बस आणि १ हजार २५० चालक दाखल होण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार धुळे विभागातून १५० एसटी बससह चालक, नाशिक, सांगली, सोलापूर, अहमदनगर या प्रत्येक विभागातून प्रत्येकी १०० एसटी बससह चालक, सातारा या विभागातून ७५ एसटी बससह चालक, बीड, रत्नागिरी, रायगड औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, जालना या प्रत्येक विभागातून प्रत्येकी ५० एसटी बससह चालक असे एकूण ९७५ चालक आणि एसटी बस मुंबई, पालघर, ठाणे या विभागात दाखल होणार आहेत. तर, औरंगाबाद विभागातून १०० चालक, सातारा विभागातून ७५ चालक आणि बीड, जळगाव या विभागातून प्रत्येकी ५० चालक असे एकूण २७५ चालक दाखल होणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाउन वाढला ; नाशिक जिल्हयात अशी असेल नियमावली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -