घरCORONA UPDATECorona: केडीएमसीच्या स्थायी समितीत कोरोनाचा शिरकाव

Corona: केडीएमसीच्या स्थायी समितीत कोरोनाचा शिरकाव

Subscribe

कल्याण-डोबिवली महापालिकेच्या दोन स्थायी समिती सदस्यांनाच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाल्याने केडीएमसीमध्ये खळबळ उडाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले हे सदस्य स्थायी समितीच्या बैठकीलाही उपस्थित राहिल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य दोन स्थायी समिती सदस्यांना ही १४ दिवस विलगीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने प्रती दिवशी अडीचशेच्या घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. आजमीतिला कल्याण-डोंबिवलीतील कोरोना ग्रस्तांची एकूण संख्या तीन हजार सातशेच्या घरात गेली आहे. ठाण्यातील एका नगरसेवकाचा तर कोरोनामुळे काही दिवसांपूर्वीच मृत्यू ओढवला होता .आता हेच लोण कल्याण-डोंबिवली शहरातही पसरू लागले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय १६ सदस्य आहेत १७ जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हे दोन्ही नगरसेवक उपस्थित होते. महापालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थायी समिती सभागृहाचे प्रत्येक बैठकीपूर्वी तसेच समितीची बैठक संपन्न झाल्यानंतरही दोन वेळा निर्जंतुकीकरण करण्यात येते. तसेच संपूर्ण इमारतीचे ही प्रत्येक दिवशी निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये सहा फुटांचे कमीतकमी सोशल डिस्टंसिंग पाळण्यात येते असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे जरी बैठकीला हे दोन्ही सदस्य उपस्थित राहिले असले तरी त्यामुळे सर्व सदस्यांना तसेच बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना १४ दिवसांचे विलगीकरण करण्याऐवजी या दोन सदस्यांच्या आजुबाजूला असलेल्या अन्य दोन स्थायी समिती सदस्य नाही १४ दिवसांसाठी गृह विलगीकरण करण्याच्या सूचना पालिकेने दिले आहेत.

- Advertisement -

 हेही वाचा –

मग तरीही चिनी मीडिया पंतप्रधान मोदींची स्तुती का करतोय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -