घरताज्या घडामोडीपुणे : दिवसभरात २१२ रुग्णांची नोंद; तर ८ जणांचा मृत्यू

पुणे : दिवसभरात २१२ रुग्णांची नोंद; तर ८ जणांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात दिवसभरात २१२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ६८६ वर गेली आहे. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पुण्यात दिवसभरात २१२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ६८६ वर गेली आहे. तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. तर पुण्यात आतापर्यंत ५१८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता अधिक वाढली आहे.

दरम्यान, कोरोनावर उपचार घेणार्‍या २५५ रुग्णांची तब्येत ठणठणीत झाल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर ७ हजार ६७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

- Advertisement -

पिंपरी-चिंचवडमध्ये ९८ कोरोनाबाधित

पुणे पाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये देखील आज नव्याने ९८ करोनाबाधित रुग्ण आढळले असून चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर शहरातील बाधित रुग्णांची संख्या १ हजार ८६३ वर पोहचली असून आज ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत ५७ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर आजतागायत अकराशेहून अधिक जण करोनामुक्त झालेले आहेत.

राज्यात ३७२१ कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात आज ३ हजार ७२१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३५ हजार ७९६ वर गेली आहे. तर आज राज्यात ६२ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ६ हजार २८३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नवीन नाशिक : बुधवारपासून व्यवसाय स्वयंस्फूर्तीने बंद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -