घरताज्या घडामोडीमग तरीही चिनी मीडिया पंतप्रधान मोदींची स्तुती का करतोय?

मग तरीही चिनी मीडिया पंतप्रधान मोदींची स्तुती का करतोय?

Subscribe

भारत - चीनमध्ये सीमेवर तणाव असताना दुसरीकडे या मुद्द्यावरुन राजकारणही चांगलेच तापलेले दिसून येत आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

भारत – चीनमध्ये सीमेवर तणाव असताना दुसरीकडे या मुद्द्यावरुन राजकारणही चांगलेच तापलेले दिसून येत आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ‘चिनी सैनिक भारतीय जवानांची हत्या करत आहेत. चीनकडून भारतीय जमिनीवर कब्जा केला जात आहे. मात्र, असे असताना देखील चिनी मीडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती का करत आहेत’?, असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रातील बातमी ट्विटमधून शेअर केली आहे. चिनी सैनिकांकडून पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय जवानांची हत्या झाली. चीन भारताच्या जमिनीवर कब्जा करतोय. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. या अशा स्थितीतही चिनी मीडियाने पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर आनंद व्यक्त केलाय आणि त्यांची स्तुतीही केलीय, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वीही राहुल गांधी यांनी जपान टाइम्समधील एक लेख शेअर करत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी उपग्रहाद्वारे मिळालेले फोटो पोस्ट करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. चिनी सैन्याने भारत मातेच्या पवित्र भूमीवर कब्जा केल्याचे उपग्रहाद्वारे मिळालेल्या फोटोंवरून स्पष्ट होते, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी आज पुन्हा पंतप्रधान मोदींवर टीका केलीय आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पर्यटकांसाठी खुशखबर! ७ जुलैपासून पर्यटकांना दुबईला जाता येणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -