घरक्राइमCrime : ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला, पुतणी गंभीर जखमी; शिवसेनेचे...

Crime : ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला, पुतणी गंभीर जखमी; शिवसेनेचे आमदार धावले मदतीला

Subscribe

मुंबई : बोरीवलीमधून धक्कादायक घटना समोर येत आहे. ठाकरे गटाच्या (Thackeray Group) माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे (Riddhi Khursange) यांच्या घरात घुसून अज्ञातांनी त्यांच्या पुतणीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्यांची पुतणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नगरसेविकेच्या घरावरील हल्ल्यानंतर शिवसेनेचे आमदार मदतील धावून गेल्याचे पाहायला मिळाले. (Crime Attack on Thackeray groups former corporators house nephew seriously injured Shiv Sena MLAs rushed to help)

हेही वाचा – वरळीतील माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांचा ठाकरे कुटुंबावर निशाणा

- Advertisement -

मुंबईच्या (Mumbai) बोरिवली (Borivali) पूर्वेकडील अभिनव नगर परिसरात राहणाऱ्या रिद्धी खुरसंगे यांच्या घरात घुसून अज्ञातांनी त्यांच्या पुतणीवर हल्ला केला. या हल्ल्यात खुरसंगे यांची पुतणी गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नगरसेविकेच्या घरावरील हल्ल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) मदतीला धावून गेल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी या संदर्भात त्वरीत कारवाई करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. या घटनेमुळे मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.

हेही वाचा – आपले सांगाडे बाहेर निघतील हे लक्षात आल्यामुळे…; फडणवीसांनी पाटण्यातील बैठकीवर साधला निशाणा

- Advertisement -

शिवसेनेत वाद असताना प्रकाश सुर्वे मदतीला धावले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गेल्या वर्षी 40 आमदारांनी घेऊन बंडखोरी केली आणि भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे असे शिवसेनेचे दोन गट पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षभरापासून दोन्ही गटात कायम वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद बाजूला ठेवत प्रकाश सुर्वे मदतीला धावून गेले.  प्रकाश सुर्वे यांना रिद्धी खुरसंगे यांच्या घरावर अज्ञातांनी केलेल्या हल्ल्याबाबत समजताच त्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. प्रकाश सुर्वे यांनी रुग्णालयात जाऊन रिद्धी खुरसंगे यांच्या पुतणीची भेट घेतली असून तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. याशिवाय घडलेल्या धक्कादायक घटनेचा तपास करुन आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -