घरमुंबईवरळीतील माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांचा ठाकरे कुटुंबावर निशाणा

वरळीतील माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्यांचा ठाकरे कुटुंबावर निशाणा

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) यांनी गेल्या वर्षी शिवसेनेतील (Shivsena) 40 आमदारांह बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेतील खासदार, नगरसेवक, पदाधिकारी यांनी एक-एक करून शिवसेनेची साथ सोडली आणि शिंदेना साथ दिली. आज एक वर्षानंतरही उद्धव ठाकरेंना धक्के बसण्याचे थांबत नाही आहे. वरळीतील माजी नगरसेवक संजय अगलदरे यांनी आज (27 जून) शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाकरें कुटुंबावर (Thackeray family) निशाणा साधला आहे. (Former corporator from Worli joins Shiv Sena The Chief Minister targeted the Thackeray family)

हेही वाचा – केसीआर ही बीजेपीची बी टीम; सोलापूर दौऱ्यावरून संजय राऊतांचा पुन्हा एकदा हल्लाबोल

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, यावर्षी पावसाने उशिरा सुरूवात केली आहे. दरवर्षी बळीराजा पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत होता. बळीराजा, शेतकरी आणि पाऊस याचं जे काही नातं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि आपल्याला प्रत्येकाला याची जाणीव असली पाहिजे म्हणून मला विचारल्यावर मी बोललो की, ‘पाऊस आला तर स्वागत करा’, स्वागत केलंच पाहिजे होतं कारण पाऊस यावेळी थोडा लांबला होता. त्यासोबत मी हेही म्हणालो की, मुंबईमध्ये लोकांची गैरसोय झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई देखील होईल. पण तेवढं बाजूला राहिलं आणि नेमकं पावसाचं स्वागत करूया पुढं आलं. त्यामुळे असं करू नका तुम्ही, जे खरं आहे ते छापा, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना केली.

हेही वाचा – गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी; विशेष रेल्वे गाड्यांना ‘या’ स्टेशनवर मिळणार थांबा

- Advertisement -

मोर्चे तुम्ही तुमच्या घरावर काढले पाहिजे

माजी नगरसेवक संजय अगलदरे यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, जे आरोप करत आहेत मुंबईबद्दल आस्था नाही, परंतु मुंबईवर गेली 15-20 वर्ष सत्ता तुमची होती. सर्व मुंबईची लुट तुम्ही केली. मुंबईला ओरबाडले तुम्ही. आज हजारो कोटी रुपये मुंबईकरांचे कुठे गेले याचा हिशोब द्यायला नको म्हणून मोर्च काढत आहेत. अरे कुठले मोर्चे, कोणावर मोर्चे, कशाला मोर्चे, खरं म्हणजे हे मोर्चे तुम्ही तुमच्या घरावर काढले पाहिजे, कारण या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. 15 वर्षे तुम्ही मुंबईला लुटले आहे. 15 वर्षे मुंबईकरांचे पैसे आता सतकारणी लागत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -