घरमुंबईसायबर क्राईम वाढले, आरोपी मात्र मोकाट

सायबर क्राईम वाढले, आरोपी मात्र मोकाट

Subscribe

गुन्हे रोखताना पोलिसांच्या नाकी नऊ

मुंबई:-गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन पद्धतीने होणार्‍या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातील आरोपींच्या मागावर सायबर सेलचे पोलीस अधिकारी आहेत. बँक, क्रेडिट-डिबेट कार्ड, विवाह नोंदणी संकेतस्थळे अशा विविध ठिकाणी लुटणार्‍या टोळ्या विविध पैशाची, नोकरीचे आमिष दाखवून लुटणार्‍या टोळ्यांचे अनेक फंडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अवलंबले जातात. त्यामुळे अशी गुन्हेगारी रोखताना पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. २०१७ साली घडलेल्या सायबर क्राईमची आकडेवारी पाहिली असता गुन्हे सिद्ध होऊन आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे प्रमाण फक्त १६ टक्के आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून घडलेल्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात सायबर सेलच्या अधिकार्‍यांना अपयश येत आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

२०१७ साली एकूण सायबर क्राईमच्या ४०३५ गुन्ह्यांची नोंद सायबर पोलिसांकडे करण्यात आली होती, त्यापैकी १०४१ प्रकरणांचा पोलिसांनी छडा लावून एकूण १३६७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे गुन्हे सोडवण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. सायबर क्राईम करण्यासाठी आरोपी नेहमीच वेगवेगळी शक्कल लढवून पैसे लुबाडत असतात. बर्‍याच प्रकरणांमध्ये पोलिसांना गुंगारा दिला जातो. मात्र मागच्या तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार २०१७ सालचे गुन्हे सिद्ध होऊन आरोपींना पकडण्याचे प्रमाण कमी असल्याची माहीती सायबर सेलच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

- Advertisement -

सायबर सेलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार दिवसाला जवळपास हजारच्या घरात सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यांची राज्यभरात नोंद होते. सायबर विभाग पोलिसांची टीम यासाठी काम करतच असते. मात्र बरेचसे गुन्हे हे परराज्यांतील टोळ्यांकडून होत असल्याने ते रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी वेळ लागतो. लोकांमध्येसुद्धा याविषयी जागृती होणे गरजेचे आहे.

गेल्या चार वर्षांत घडलेले सायबर क्राईमचे गुन्हे-

१) २०१५ साली एकूण २१९५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी ७७७ प्रकरणे उलगडण्यात आल्या असून ८२५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या वर्षी सोडवण्यात आलेल्या गुन्ह्यांची वार्षिक टक्केवारी जवळपास ४० टक्के आहे.
२) २०१६ साली एकूण २३८० सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.त्यापैकी १००९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून ७९१ प्रकरणे उलगडण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.यावर्षी सोडवण्यात आलेल्या गुन्ह्यांची वार्षिक टक्केवारी २३ टक्के आहे.
्र३) २०१७ साली एकूण ४०३५ गुन्हे नोंदवण्यात आले त्यापैकी १०४१ केसेस उलगडण्यात आल्या असून १३६७ जणांना अटक करण्यात आली आहे.तर गुन्हे सिद्ध होऊन आरोपींना पकडण्याची वार्षिक टक्केवारी ही १६ टक्के आहे.
४) २०१८ या चालू वर्षांत मे महिन्यापर्यंत एकूण १६६५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ४४९ प्रकरणांचा उलगडा झाला आहे तर ४८८ जणांना अटक झाली आहे. बाकीच्या प्रकरणांचा तपास सुरू असून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

दररोज घडणार्‍या सायबर गुन्ह्यांना सामोरे जात असाताना वेगवेगळ्या पद्धती समोर येत असतात. त्यानुसार तपास सुरू होतो. एखादे प्रकरण सोडवत असताना बराच वेळ लागतो.परराज्यातून होणार्‍या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप असते.यामध्ये प्रामुख्याने बिहार,आंध्र प्रदेश, युपी,पटणा आणि दिल्ली या राज्यांचा समावेश असतो. लोकांनी कोणत्याही लालसेला बळी न पडता सोशल मीडियामधून मिळणार्‍या बोगस ऑफर्सना टाळावे, असे आवाहन आम्ही वारंवार करत असतो. तरीही असे गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे नोंद होणार्‍या तक्रारींची संख्या जास्त आहे.
– बलसिंग राजपूत, पोलीस अधीक्षक,राज्य सायबर विभाग.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -