घरमुंबईबीकेसीतील करोना केंद्राचे नुकसान

बीकेसीतील करोना केंद्राचे नुकसान

Subscribe

करोना बाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) करोना उपचार केंद्राला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. मात्र, विशेष म्हणजे या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊनच मंगळवारी येथील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवल्याने मोठी हानी टळली. तरीही करोना केंद्राचे नुकसान झाले आहे.

करोना रुग्णांसाठी बीकेसीमधील गाऊंडवर करोना उपचार केंद्र उभारण्यात आले होते. या उपचार केंद्रात सुमारे ४५० रुग्णांवर इलाज करण्यात येत होता. चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन मंगळवारीच येथील रुग्णांना वरळीतील वल्लभभाई स्टेडियममधील डोममध्ये हलवण्यात आले. बुधवारी सोसाट्याचे वारे आणि पावसामुळे या केंद्रात अनेक ठिकाणी पाणी साठले होते. तसेच केंद्राचे काही पत्रेही वार्‍यामुळे उडून गेले.

- Advertisement -

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेऊन राज्य सरकारने बीकेसीमध्ये महत्त्वकांक्षी कोविड 19 उपचार केंद्राची उभारणी केली होती. स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनेकदा त्याचा उल्लेख करुन महाराष्ट्राची पूर्ण तयारी असल्याचं म्हटलं होतं. मात्र, कोरोनासोबतच अचानकपणे महाराष्ट्रात धडकलेल्या या चक्रीवादळाच्या संकटाने ही बीकेसीतील ही तयारी विस्कळीत केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -