घरदेश-विदेशअमेरिकेत आंदोलनकर्त्यांकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना

अमेरिकेत आंदोलनकर्त्यांकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना

Subscribe

अमेरिकेत वर्णभेदाचा बळी ठरलेल्या जॉर्ज फ्लॉयडच्या पोलीस कस्टडीतील मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवला. काही ठिकाणी घोषणाबाजी, निदर्शनेही झाली. दरम्यान, वॉशिंग्टन डीसी ब्लॅक लाइव्स मॅटर्सच्या काही संतप्त आंदोलनकर्त्यांनी भारतीय दूतावासाबाहेरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे समोर आले आहे. यासंबंधी संयुक्त राज्य पार्क पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे एएनआयने म्हटले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

अमेरिकेतील मिनिआपोलिस शहरात सोमवारी ४६ वर्षीय जॉर्ज फ्लॉइड यांच्या गळ्यावर गुडघा ठेऊन बसलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये जॉर्ज आपल्याला श्वास घेता येत नसल्याचं या पोलिसांना सांगतानाही दिसत आहेत. या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. तर डेरेक शॉविन या ४४ वर्षीय श्वतेवर्णीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर देशातील अनेक भागात हिंसाचार भडकला. अमेरिकेच्या मिनियापोलिस व्यतिरिक्त फ्लोरिडा, जॅक्सनविले, लॉस एंजेलिस, पिट्सबर्ग, न्यूयॉर्कसह अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ४ पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं आहे. शिवाय, या प्रकरणाची चौकशी करण्याचे जाहीर केले. परंतु पोलिसांना अटक करुन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -