घरताज्या घडामोडीVideo: सायननंतर राजावाडी रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर!

Video: सायननंतर राजावाडी रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर!

Subscribe

सायना रुग्णालयातील धक्कादायक व्हिडिओनंतर घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयतील वास्तव समोर आले आहे.

सायन रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाशेजारीच इतर रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात जनरल वॉर्डमध्ये मृतदेह १० ते १२ तासांपासून तसाच पडून असल्याचे धक्कादायक वास्तव या व्हिडिओमधून समोर आले आहे.

या व्हिडिओमध्ये या मृतदेहा शेजारील बेडवरील महिला रुग्णाचा आवाज ऐकू येत आहे. ‘या मृतदेहाला १० ते १२ तास झाले आहेत. तो प्लास्टिकमध्ये कॅव्हर करून ठेवला असून त्या मृतदेहाच्या बाजूला पेशंट्स आहेत. तसेच शेवटी आणखी एक मृतदेह ठेवला आहे. यामुळे आमच्या जीवाला खूप धोका आहे. कोणीही स्टाफ इथे आलेला नाही आहे. मी माझ्या बाटलीतील पाणी घ्यायचा प्रयत्न केला पण माझ्याकडे ग्लोव्ह्ज नाही आहेत. सेफ्टी किट नाही आहे’, असे या व्हिडिओमध्ये मृतदेहा शेजारील महिला रुग्ण सांगत आहे.

- Advertisement -

धक्कादायक! राजावाडी हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये मृतदेह १२ ते १३ तास तसाच पडून!

धक्कादायक! राजावाडी हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये मृतदेह १२ ते १३ तास तसाच पडून!

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಮೇ 24, 2020

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. खरंच परिस्थितीत बदलली आहे? की आपण आशाच सोडून द्यायची असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला आहे.

- Advertisement -

तसेच काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी देखील राजवाडी रुग्णालयामधील हा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘हे अमानुष कृत्य आहे. याबाबत मुंबई महापालिकेने दखल घ्यावी आणि रुग्णालयाच्या डीनला निलंबित करायला हवं’, अशी मागणी त्यांनी केली आहे.


हेही वाचा – वडाळा पोलीस ठाण्यातील शिपायाचा नाशिकमध्ये मृत्यू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -