घरमुंबईचेंबूर येथे अपघातात तरुणाचा मृत्यू तर दोनजण जखमी

चेंबूर येथे अपघातात तरुणाचा मृत्यू तर दोनजण जखमी

Subscribe

चेंबूर येथे अपघातात पवन धनश्याम कोरी या 18 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याचे दोन मित्र मयुरेश मांडवकर आणि रुपेश शिवाजी शिकरे जखमी झाले. पवन कोरी याने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याच्याविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी अपघातात स्वत:च्या मृत्यूस तर इतर दोघांना दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा अपघात गुरुवारी रात्री दिड वाजता चेंबूर येथील पूर्व दुतग्रती महामार्गावरील अमरमहल ब्रिज चढणीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी रात्री पवन हा त्याचे दोन मित्र मयुरेश आणि रुपेश यांच्यासोबत त्याच्या स्कूटीवरुन चेंबूरहून धारावीच्या दिशेने जात होता. त्याने मद्यप्राशन केले होते. पूर्व दुतग्रती महामार्गावरुन ट्रिपल सीट भरवेगात जाताना अमरमहल ब्रिजच्या चढणीवर त्याचे स्कूटीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने तेथीलच दुभाजकाला स्कूटी आढळली. या अपघातात ते तिघेही जखमी झाले होते, अपघाताची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

- Advertisement -

जखमी तिघांनाही पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, तिथे पवनला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर इतर दोघांवर उपचार सुरु केले होते. रुपेशच्या जबानीवरुन पोलिसांनी पवन कोरीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. चौकशीत त्याने पवनने मद्यप्राशन करुन भरवेगात स्कूटी चालविण्याचा प्रयत्न केला होता, या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -