घरमुंबईथकबाकीत धनदांडग्यांना सूट, सामान्यांना जाच !

थकबाकीत धनदांडग्यांना सूट, सामान्यांना जाच !

Subscribe

नगरसेवक वामन म्हात्रे यांचा पालिकेवर आरोप

केडीएमसीच्या स्थायी समितीच्या आढावा बैठकीत कर थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात आला असून 100 थकबाकीदारांची नावे उघड करण्यात येणार आहेत. मात्र, महापालिकेत 1836थकबाकीदार आहेत ज्यात मोठे बिल्डर, वास्तूविशारद आणि श्रीमंत लोक आहेत. यांच्याकडून थकबाकी वसुली केली जात नाही. फक्त सामान्य नागरिकांना त्रास दिला जातो, असा गंभीर आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी केल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डळमळीत असल्याने ती सुधारण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील यासाठी केडीएमसीच्या स्थायी समितीने एक आढावा बैठकीचे आयोजन केले होते. केडीएमसीची आर्थिक परिस्थिती कशी सुधारणार, याबाबत काही निर्णय घेतले गेले. यावर्षी 470 कोटी विविध कर वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंत 173 कोटी वसुली झाली आहे.

- Advertisement -

टॉप १०० थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात
महापालिका क्षेत्रात ज्यांची कर थकबाकी आहे. त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. टॉप 100 थकबाकी दारांची नावे वृत्तपत्रात घोषित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. थकबाकीदारांनी दिलेले धनादेश बाऊन्स झाले आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी सांगितले. मात्र, स्थायी समितीच्या कामकाज आणि निर्णयावर स्थायी समिती सदस्य आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महापालिकेचे 100 नाही तर 1836 थकबाकीदार आहेत. ज्यात मोठ मोठे बिल्डर, वास्तूविशारद आणि श्रीमंत आहेत.यांच्याकडून यांच्याकडून थकबाकी वसुली केली जात नाही. फक्त सामान्य नागरिकांना त्रास दिला जातो, असे म्हात्रे यांनी आरोप केले. जोपर्यंत श्रीमंत थकबाकीदारांकडून कर वसुली केली जात नाही, तोपर्यंत सर्व सामान्य जनतेने कर भरू नये, असे आवाहन नगरसेवक म्हात्रे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -