घरमुंबईराजकीय दंगलीमुळे भारताची श्रीलंका, युक्रेनपेक्षा बिकट स्थिती होईल- संजय राऊत

राजकीय दंगलीमुळे भारताची श्रीलंका, युक्रेनपेक्षा बिकट स्थिती होईल- संजय राऊत

Subscribe

“भाजपकडून राजकीय फायद्यासाठी राजकीय दंगली घडवून आणल्या जात आहे, यामुळे देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षाही बिकट होईल, संपुष्टात येईल” असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज माध्यमांसमोर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “देशभरात सुरु असलेल्या दंगली भापजने घडवून आणल्या आहेत हे स्पष्ट दिसतेय. याआधी रामनवमी, हनुमान जयंतीला कधी दंगली झाल्या नाहीत. लोकांनी हे सण शांतपणे साजरे केले, दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे. तेथील कायदा आणि सुव्यवस्था केंद्राच्या हातात आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तिथे दंगली सुरु आहेत कारण तेथील महानगरपालिकांच्या निवडणुकांवर भाजपचे लक्ष्य आहे. मुळात दिल्लीत महानगपालिकाच्या निवडणुका भाजपने पराभवाच्या भीतीने पुढे ढकलल्या आणि आता त्यांच्या हातून ही महानगरापालिका जाणार हे लक्षात आल्यानंतर भाजपाने दंगली सदृष्य परिस्थिती निर्माण केली”, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

राऊतांनी राज ठाकरेंवर साधला अप्रत्यक्ष निशाणा 

“हे सर्व नगर परिषदेच्या निवडणुका जिंकण्यासाठी कोणताही विषय नसल्याने घडवून आणले जात आहे. मुंबईत देखील भाजपने कोणाला तरी हाताशी धरून असेच तणावपूर्ण वातावरण निर्माण केले आहे, मुंबईत त्यांची ताकद नसल्याने कोणाकडे तरी हे काम सोपवले आहे, यात लाऊडस्पीकरचा मुद्दा उचलून ठरला”, अशा शब्दात राऊतांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. “मुंबईत लाऊड स्पीकरवरून तवाणपूर्ण वातावरण निर्माण केले. देशातील प्रमुख शहरांमध्ये दंगली सदृष्य परिस्थिती निर्माण केली आहे. ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रोजगार व्यापार, उद्योग याला मोठा धक्का बसला आहे, असे देखील राऊत म्हणाले.

- Advertisement -

“याला सर्वस्वी भाजप जबाबदार”

“कोरोना संकटातून जग आत्ता कुठे सावरतेय, लोक आत्ता कुठे काम धंद्याला जायला लागले, लोकांच्या चुली आता कुठे पेटू लागल्या. उद्योगपती, व्यापारी आत्ता कुठे या धक्क्यातून संकटातून सावरत आहेत. अर्थव्यवस्थेला गती मिळत असताना परत तुम्ही दंगे निर्माण केले. परदेशी गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. देशातील उद्योगपती गुंतवणुक करण्यासाठी तयार नाहीत. मजूर वर्ग पळून जातोय असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे, याला सर्वस्वी जबाबदार भाजप आहे. त्यांना या देशातील कष्टकरी, शेतकऱ्यांबद्दल काही पडलेलं नाही. त्यांना फक्त दंगलीच्या माध्यमातून राजकारण करून निवडणुका जिंकायच्या आहेत. हे या देशाचे दुर्दैवी आहे,” अशी टीका देखील खासदार संजय राऊत यांनी केली आहेत

“आघाडी एकत्रच लढणार”

“आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. जिथे शक्य तिथे आम्ही एकत्र येऊन लढू. नांदेडमध्ये आम्ही जिंकलो. हा यशस्वी फॉर्म्युला झाला आहे. त्याची भीती वाटणाऱ्यांनी दंगलीची भीती निर्माण केली आहे”, असा दावाही राऊतांनी केला आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -