घरमुंबई'ठाणे महापालिकेत पीएफ घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करा'

‘ठाणे महापालिकेत पीएफ घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करा’

Subscribe

साफसफाईसाठी नेमलेल्या ठेकेदारांनी कर्मचार्‍यांच्या पीएफमध्ये घोटाळा केला असून त्याची चौकशी करून त्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ठाणे महानगर पालिकेने साफसफाईसाठी नेमलेल्या ठेकेदारांनी कर्मचार्‍यांच्या पीएफमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्याचा प्रकार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उघडकीस आणला आहे. या कंत्राटदारांनी पीएफ (भविष्य निर्वाह निधी) चे पैसे भरल्याच्या पावत्या जमा केल्याशिवाय त्यांना देयके दिली जाऊ नयेत, असा नियम असतानाही त्यांना देयके दिली असल्याने पालिकेतील अधिकारीही या भ्रष्टाचारात सहभागी आहेत, असा आरोप करुन सदर प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा – लोकलवरील दगडफेकीत मागील सहा वर्षात ११३ जण जखमी

भ्रष्टाचाराची स्वतंत्र चौकशी करावी

”ठाणे महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांनी एक अक्षम्य गुन्हा केला आहे. गोरगरीब कामगार रोजंदारीवर किंवा कंत्राटी पद्धतीने शहरातील साफसफाईचे काम करीत असतात. त्यांचे पीएफ (भविष्य निर्वाह निधी) आणि ग्रॅच्युईटी भरणे संबंधित कंत्राटदारावर बंधनकारक करण्यात आलेले आहे. जोपर्यंत त्या संदर्भातील पावत्या ठामपामध्ये जमा केल्या जात नाहीत. तोपर्यंत सदर कंत्राटदाराला त्याचे देयक देऊ नये, असा कायदाच शासनाने केलेला आहे. असे असतानाही ठामपामध्ये कोणत्याही भविष्य निर्वाह निधीची तपासणीच करण्यात आलेली नाही. तरीही ‘समझोत्याने’ कंत्राटदाराला त्याचे देयक अदा केलेले आहे. हा प्रकार म्हणजे मोठा भ्रष्टाचार असून सबंध प्रशासनच त्यामुळे अडचणीत येऊ शकते. त्यामुळे या प्रकाराची स्वतंत्ररित्या चौकशी करून गोरगरीब सफाई कर्मचार्‍यांचे पैसे खाणार्‍या माणसाला घरी बसवावे,” अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -