घरक्रीडाअंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कात टाकणार; आशियाई फुटबॉल स्पर्धेसाठी सज्जता

अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कात टाकणार; आशियाई फुटबॉल स्पर्धेसाठी सज्जता

Subscribe

अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची व विकासात्मक कामे करण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या अंधेरी येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये फेब्रुवारी-मार्च २०२२ या कालावधीत महिलांची आशियाई फुटबॉल चषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची व विकासात्मक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे हे कॉम्प्लेक्स लवकरच कात टाकणार आहे. या कामांसाठी आवश्यक असणारा ६० लाख रुपयांचा निधी बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान यांना देण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये काही दुरुस्ती, सुविधा आणि रंगरंगोटी आदी कामे करण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या अंधेरी येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल) येथे महिलांची आशियाई फुटबॉल चषक स्पर्धेचे पुढील वर्षी आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी आणि मार्च या कालावधी पार पडणार आहे.

- Advertisement -

या मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आयुक्त, अतिरिक्त पूर्व उपनगरे आणि आशियाई फुटबॉल महासंघाचे पदाधिकारी यांच्यात बैठकही झाली होती. त्यानुसार २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.


हेही वाचा – अँडरसनने तब्बल सातव्यांदा केली कोहलीची शिकार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -