घरमुंबईDharavi Redevelopment Project : घरांवर नंबर टाकण्याची कार्यवाही सुरू; पात्रतेसाठी डिजिटल सर्व्हेक्षण

Dharavi Redevelopment Project : घरांवर नंबर टाकण्याची कार्यवाही सुरू; पात्रतेसाठी डिजिटल सर्व्हेक्षण

Subscribe

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि उद्योगपती अदानी यांना कंत्राटकाम देण्यावरून वादग्रस्त ठरलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकास कामाला सुरुवात झाली आहे. आज धारावी झोपडपट्टीमध्ये घरांच्या सर्व्हेक्षण कामाला जोमात सुरुवात करण्यात आली आहे. या सर्व्हेक्षण कामातून झोपडी, घर, गाळा आदी अधिकृत की अनधिकृत आहेत, ते पुनर्विकास प्रक्रियेत पात्र ठरणार की अपात्र याचा अंदाज घेण्यात येणार आहे. त्यानुसार पुढे अंतिम पात्र झोपडी धारकांना पर्यायी घरे, गाळे उपलब्ध करण्यात येणार आहेत. या सर्व्हेक्षण प्रसंगी धारावी विकास प्राधिकरणाचे सीईओ एस.व्ही.आर. श्रीनिवास आणि इतर वरिष्ठ अधिकारी वर्ग उपस्थित होते. आज नियोजित कार्यक्रमानुसार, धारावी येथील कमला रमन येथील घरांच्या सर्व्हेक्षण कामाला सुरुवात करण्यात आली. (Dharavi Redevelopment Project Numbering of houses started Digital Survey for Eligibility)

हेही वाचा – Raj Thackeray : मनसे-भाजपा युतीच्या हालचालींना वेग; राज ठाकरे दिल्लीला रवाना

- Advertisement -

सदर सर्व्हेक्षण कामाला आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या प्राधिकरणाची एक टीम घरांचे सर्व्हेक्षण काम करीत आहे. घरांवर नंबर टाकण्यात येत आहेत. त्यावरून धारावी झोपडपट्टीत नेमकी घरे, गाळे आदींची एकूण संख्या किती आहे. त्यामध्ये किती जणांकडे अधिकृत कागदपत्रे आहेत. किती जण या सर्व्हेक्षणमधून पात्र आणि अपात्र ठरतील याबाबत नेमकी माहिती हाती येणार असल्याचे श्रीनिवास यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पात्रतेसाठी डिजिटल सर्व्हेक्षण

धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची दुसरी टीम पुन्हा पात्र झोपडीधारकांची कागदपत्रे व निकष यानुसार कागदपत्रे पडताळून कोण पात्र आणि कोण अपात्र ठरणार याबाबत अहवाल तयार करणार आहे. त्यासाठी नागरिकांनी आपल्या घरांची कागदपत्रे तयार ठेवून संबधित सर्व्हेक्षण करणाऱ्या अधिकारी, टीम यांना दाखवावी, असे आवाहन श्रीनिवास यांनी नागरिकांना केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Electoral Bond : महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षाला मिळाले नाही निवडणूक रोखे

धारावीकरांना मिळणार 350 चौ. फुटांचे घर

धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत पात्र झोपडीधारकांना किमान 350 चौ.फुटांचे पक्के घर देण्यात येणार आहेत. तसेच, धारावी पुनर्विकास प्राधिकरण टीम घरोघरी जावून भेट देवून तळमजला अधिक एक मजली, दोन मजली घरांचे सर्व्हेक्षण करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -