घरमुंबईमहिला पोलीस बनणार श्वानांच्या हॅन्डलर

महिला पोलीस बनणार श्वानांच्या हॅन्डलर

Subscribe

मुंबई पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या पाच श्वानांच्या हॅन्डलर म्हणून काम पाहण्याची जबाबदारी प्रथमच महिला पोलिसांना देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून असा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे. १७ जानेवारीला मुंबई पोलिसांच्या श्वानांच्या ताफ्यात नव्याने पाच श्वान दाखल झाले.

बेल्जियम मेलोनॉईज शेफर्ड जातीचे हे पाच नवीन श्वान आहेत. गुन्ह्यांच्या उकलीसाठी तपासात मदत म्हणून त्यांचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच पोलिसांनी या श्वानांच्या संगोपनासाठी महिला पोलिसांची नियुक्ती केली आहे. हे पाचही श्वान खूप कमी वयाचे आहेत, पण यांना १८ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे श्वान वास घेऊन एखाद्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तरबेज असतात त्यामुळेच मुंबई पोलीस या श्वानांच्या प्रतिक्षेत अनेक वर्षांपासून होते. आतापर्यंत मुंबई पोलीस दलात लॅब्रोडर, जर्मन शेफर्ड या श्वानांचा वापर करण्यात आला होता.

- Advertisement -

भारताच्या शस्त्रदलात अशा श्वानांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या श्वानांचे प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांना बॉम्बशोधक पथकात घेतले जाण्याची शक्यता आहे, असे सुत्रांनी सांगितले. या श्वानांपैकी प्रत्येकाची किंमत जवळपास ७५ हजारांच्या आसपास असल्याचे बोलले जात आहे. नव्याने दाखल झालेल्या या श्वानांची भविष्यात मुंबई पोलिसांना मदत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -