घरमुंबईडॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची प्रतिकृती तयार

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची प्रतिकृती तयार

Subscribe

स्मारकाचे २० टक्के काम पुर्ण

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या पुतळ्याची प्रतिकृती बनविण्याचे काम पुर्ण झाले आहे. दोन वेगवेगळ्या उंचीच्या प्रतिकृतीचे काम पुर्ण झाले आहेत. पण पुतळ्यासाठीच्या कामासाठी नेण्यात आललेल्या समितीने पुतळ्याच्या कामात काही बदल सुचवले आहेत. हे बदल निश्चित झाल्यानंतरच प्रत्यक्षात तयार होणार्‍या पुतळ्यासाठीच्या कामाला सुरूवात होऊ शकेल.

पुतळ्यावरील भाव कसे असावे तसेच या पुतळ्याचे स्वरूप कसे असावे यासाठी समितीवर तीन जणांची नेमणुक करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे समुद्रकिनारी हे स्मारक असल्याने यासाठी ब्रॉन्झ या धातूचा वापर करण्यात आला आहे. आता पुतळ्यासाठीच्या समितीने सुचवलेल्या अंतिम बदलानंतरच स्मारकासाठीच्या पुतळ्याचे काम सुरू करण्यात येईल असे समजते.

- Advertisement -

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या पुतळ्यासाठी ३५० फुट इतकी उंची आराखड्यानुसार मंजुर आहे. पण काही महिन्यांपूर्वी या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवण्याबाबतची घोषणा याआधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यामुळे आता पुतळ्याची उंची ४५० फुट इतकी होणार आहे. वाढीव उंचीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सध्या अभ्यास अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे वाढीव उंचीनुसार या प्रकल्पाअंतर्गत होणारे किरकोळ बदल हेदेखील त्यानुसार निश्चित होतील असे समजते.

स्मारकाचे २० टक्के काम पुर्णसंपुर्ण स्मारकाच्या कामासाठी एकुण ३६ महिन्यांचा कालावधी आहे. स्मारकाच्या कामापैकी एकुण २० टक्के काम आतापर्यंत पुर्ण झाले आहे. वृक्ष प्राधिकरण, सीआरझेड,्पर्यावरण, एअरपोर्ट, अग्निशमन दल, हाय राईज कमिटी यासारख्या विविध समित्यांकडून परवानग्या या टप्प्याटप्प्यात मिळाल्यानंतर हे काम आता सुरू झाले आहे. प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्याआधी स्मारकाच्या आराखड्याचीही अंतिम मंजुरी यासारख्या गोष्टी निश्चित झाल्या. सद्यस्थितीला बेसमेंट पार्किंग स्लॅबचे काम, फाऊंडेशनचे काम अशा विविध टप्प्यात काम सुरू आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -