घरमुंबईअर्भकांच्या नाळेपासून कोट्यवधी रुपयांचे औषध

अर्भकांच्या नाळेपासून कोट्यवधी रुपयांचे औषध

Subscribe

अॅब्स्ट्रॅक म्हणजे मानवी नाळेचे सत्व. यापासून तयार केलेले इंजेक्शन आणि औषध दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे इंजेक्शन तयार करण्यासाठी मानवी नाळेची मागणी मोठ्या प्रमाणात असते.

अर्भकांच्या नाळेपासून तयार केल्या जाणाऱ्या औषधांची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. पण, अर्भकांची नाळ औषध म्हणून वापरताना त्याचा वापर वैधरित्या की अवैधरित्या केला जातो, याबाबत आता विचारणा करण्यात आली आहे. सोबतच नाळेपासून तयार करण्यात येणाऱ्या औषध प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. शिवाय, औषधं तयार करण्यासाठी मोठ्या संख्येने नाळ कुठून मिळवली जाते? असे अनेक प्रश्न केंद्रीय औषध नियंत्रण विभागाला विचारण्यात आले आहेत.

अर्भकाची नाळ आरोग्यास फायदेशीर

या औषध निर्मिती कंपन्या आणि पद्धतींकडे केंद्रीय औषध नियंत्रण विभाग दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बाजारात प्लेसेट्रेक इंजेक्शन उपलब्ध होते. त्यात ह्युमन प्लेसेटा अॅब्स्ट्रॅक वापरात आणतात. ह्युमन प्लेसेंटा अॅब्स्ट्रॅक म्हणजे मानवी नाळेचे सत्व. यापासून तयार केलेले इंजेक्शन आणि औषध दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे इंजेक्शन तयार करण्यासाठी मानवी नाळेची मागणी मोठ्या प्रमाणात असते. पण, ही नाळ कशी उपलब्ध होते? बाळाच्या जन्मानंतर नाळ औषध कंपन्यांना उपलब्ध होत असेल तर त्यासाठी प्रसुतीगृहांना नियम निकष आहेत का? नाळेपासून इंजेक्शन औषध तयार करणाऱ्या एका कंपनीचे वार्षिक टर्न ओव्हर दीडशे करोड रूपये आहे. याचा अर्थ करोडो रुपयांचा व्यवहार यातून होत असतो. हा व्यवसाय इंजेक्शन मार्केट मध्ये सुरु आहे. यासाठी मोठ्या संख्येने मुलांच्या नाळेची गरज आहे. ही उपलब्धता कुठून होते. तसेच एखाद्या प्रसुती गृहातून बाळाची नाळ एखाद्या कंपनीला दिली जाणार असेल तर त्या आधी नातेवाईकांची परवानगी घेतली‌ जाते का? घरात प्रसुती झाल्यावर ही नाळ मागण्यासाठी एखादी खासगी औषधी कंपनी घरी येते का? असे अनेक प्रश्न ऑल फूड अॅंड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनकडून विचारण्यात आले आहेत.

- Advertisement -

अर्भकाला गर्भातच कावीळ झाला तर?

हल्ली अनेक बाळांना गर्भातच कावीळ होतो. कावीळ झालेल्या बाळाची नाळ औषधांमध्ये वापरल्यास त्या कावीळचा संसर्ग औषध घेणाऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. या सर्व बाबींवर केंद्रीय औषध नियंत्रण विभागाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी फाउंडेशनकडून प्रश्न विचारण्यात आले आहेत.

नाळेपासून औषध तयार करणार्या कंपन्यांची चौकशी व्हावी. मोठ्या संख्येने नाळ उपलब्ध होत असल्यास या उपलब्ध होण्याचा मार्ग मानवी तस्करीतर नाही ना याची शहनिशा केली पाहिजे
-अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अॅंड ड्रग्ज  लायसन्स होल्डर फाउंडेशन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -