घरमहाराष्ट्रअग्निशमन दल विभागाच्या मदतीने गरोदर महिला सुखरूप 

अग्निशमन दल विभागाच्या मदतीने गरोदर महिला सुखरूप 

Subscribe

संगीता केशवराम निशाद अस घरामध्ये अडकलेल्या गरोदर महिलेचे नाव असून अग्निशमन दलाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

घराच्या शेजारील नाल्याचे काम सुरू असल्याने घराच्या भिंतीला तडे जात घरात पाच महिन्याची गरोदर महिला अडकल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. दरम्यान, संबंधित महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या विभागाला यश आले आहे. संगीता केशवराम निशाद अस घरामध्ये अडकलेल्या गरोदर महिलेचे नाव असून अग्निशमन दलाचे नागरिकांनी कौतुक केले आहे. महिलेने देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी आभार मानले आहेत.

अशी घडली घटना

शनिवारी सकाळी बाराच्या सुमारास सजक नागरिक जितेंद्र ननावरे यांनी अग्निशमन दलाच्या विभागाला गर्भवती महिला घरात अडकली असून भिंतीला तडे (मोठी भेग) गेल्याने महिलेच्या जीवाला धोका असल्याचा फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली. ही घटना महात्मा फुले नगर येथे घडली होती. त्यानुसार अग्निशमन दलाचे कैलास वाघरे, चंद्रशेखर घुले, महेंद्र पाठक, विवेक खांदेवाड, प्रतीक कांबळे आणि विशाल लाडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन अवघ्या सहा मिनिटांत सदर गरोदर महिलेची सुखरूप सुटका केली.

- Advertisement -

नाल्याचे काम सुरू असताना भिंतीला पडली भेग

संगीता यांचे पती हे मजुरीचे काम करत असल्याने ते कामावर गेले होते. तसेच शेजारी असणाऱ्या एका नाल्याचे काम सुरू होते. मातीची घर असल्याने भिंतीला मोठी भेग पडली. संगीता यांनी घराच्या आतून कडी कोयंडा लावला होता. त्या घाबरून गेल्या होत्या. दरवाजा उघडला तर अवघी भिंत महिलेचे अंगावर कोसळून अनर्थ झाला असता. परंतु, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी गरोदर महिलेला बाहेर कसे काढता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तो यशस्वी देखील झाला आणि महिलेचे मृत्यूच्या दाढेतून सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याला यश आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -