घरमहाराष्ट्रपुणेकिरकोळ वादानंतर चालकाने बस रिव्हर्स घेत वाहनांना उडवले; सुळें म्हणाल्या- संतोष माने...

किरकोळ वादानंतर चालकाने बस रिव्हर्स घेत वाहनांना उडवले; सुळें म्हणाल्या- संतोष माने प्रकरणाची…

Subscribe

रविवारचा दिवस म्हणजे पुण्यातील रस्त्यावर तोबा गर्दी. या गर्दीतून वाट काढत सर्वसामान्यांना जावे लागते. अशातच पीएमपीएलच्या बसेस सर्वसामान्यांच्या सेवेसाठी धावत असतात.

पुणे : मुंबईनंतर पुण्यात कधी काय होईल सांगता येत नाही. अशातच रविवारी (22 ऑक्टोबर) पीएमपीएलच्या बस चालकाने किरकोळ वादानंतर बस रिव्हर्स घेत चार ते पाच वाहनांना धडक दिली. यामध्ये काही जण जखमी झाले. ही घटना सेनापती बापट मार्गावर घडली. घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. (After a minor argument, the driver took the bus in reverse and blew up the vehicles Sule said  Santosh Mane case…)

रविवारचा दिवस म्हणजे पुण्यातील रस्त्यावर तोबा गर्दी. या गर्दीतून वाट काढत सर्वसामान्यांना जावे लागते. अशातच पीएमपीएलच्या बसेस सर्वसामान्यांच्या सेवेसाठी धावत असतात. परंतू याच पीएमपीएलच्या बस चालकाने आज किरकोळ वादानंतर बस रिव्हर्स बस चालवत 10 ते 15 वाहनांना धडक दिली. या घटनेचा घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाला आहे. घटनेवेळी बसमध्ये 50 ते 60 प्रवासी होते.

- Advertisement -

हेही वाचा : मराठा आरक्षणाला पहिला विरोध केला तो लबाड लांडग्याने; पडळकरांची पवारांवर नाव घेता टीका

प्रवासी ओरडले ‘बस थांबवा, आम्हाला वाचवा’

पुण्यातील सेनापती बापट मार्गावर ही घटना घडत असताना यावेळी बसमध्ये 50 ते 60 प्रवासी होते. यावेळी सर्व प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. बसचे दोन्ही दरवाजे बंद असल्याने प्रवाशांना बाहेरही पडता येत नव्हतं. त्यामुळे बसमधील प्रवाशी आम्हाला वाचावा, बस थांबवा अशी याचना करीत होते.

- Advertisement -

हेही वाचा : TMC : महुआ मोईत्रांवर पक्ष कारवाई करण्याच्या तयारीत; लाच प्रकरणावर मागवले उत्तर

सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत व्यक्त केला संताप

या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही सुप्रिया सुळेंनी केली. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, संतोष माने प्रकरणाची आठवण यावी असा थरार पुन्हा एकदा पुण्यात घडला. सेनापती बापट रोड परिसरात पीएमपीएमएलच्या बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत दहा ते पंधरा गाड्यांना उडवल्याचा प्रकार घडला. या बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे असे त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -