घरक्राइमड्रग्जचे तार छत्रपती संभाजीनगरपर्यंत! DRI च्या कारवाईत 500 कोटींचे अमली पदार्थ जप्त

ड्रग्जचे तार छत्रपती संभाजीनगरपर्यंत! DRI च्या कारवाईत 500 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Subscribe

पुण्यातील ससून रुग्णालयात बसून ड्रग्ज रॅकेट चालविणारा ललित पाटील यास चेन्नईतून अटक करण्यात आली. तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक केली असली तरी अद्याप राज्यात मोठ्या प्रमाणात लहान मोठे ड्रग्ज माफिया कार्यरत आहेत. अशातच पुणे आणि अहमदाबाद डीआरआयने छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई करत तब्बल 500 कोटींचे ड्रग्ज जप्त केल्याची माहिती पुढे येत असून, ही कारवाई दोन दिवसांपूर्वीची असून, ती आज उघड करण्यात आली आहे. (Drug cables up to Chhatrapati Sambhajinagar 500 crore worth of drugs seized in DRIs action)

पुण्यातील ससून रुग्णालयात बसून ड्रग्ज रॅकेट चालविणारा ललित पाटील यास चेन्नईतून अटक करण्यात आली. तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. परंतू असे जरी असले तरी आता राज्यभर ड्रग्ज रॅकेटचा बिमोड करण्यासाठी डीआरआयकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान पुणे आणि अहमदाबाद डीआरआय विभागाने छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कारवाई करत 500 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाई संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे. या कारवाईबाबत अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आला नाही. तसेच या प्ररकणात दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जितेशकुमार हिनोरीया प्रेमजीभाई आणि संदीप शंकर कुमावत असं या आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : किरकोळ वादानंतर चालकाने बस रिव्हर्स घेत वाहनांना उडवले; सुळें म्हणाल्या- संतोष माने प्रकरणाची…

40 किलो कोकेन आणि 32 लाख रुपयांची रोकड

पुणे आणि अहमदनगर डीआरआय विभागाने छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई करत कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये 40 किलो कोकेन, 32 लाख रोख रुपये पोलिसांना आरोपींच्या घरातून मिळाले आहेत. तर गुजरातवरुन हे अमली पदार्थ आणले जात असल्याची माहिती सध्या समोर येते आहे. तिथून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अमली पदार्थ वितरित केले जात होते.

- Advertisement -

हेही वाचा : मराठा आरक्षणाला पहिला विरोध केला तो लबाड लांडग्याने; पडळकरांची पवारांवर नाव घेता टीका

आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

या कारवाईनंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. कारण, अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुळे, दानवेंनी केले आरोप

यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत, ते म्हणाले होते आम्ही यामधील संबंधित आरोपींची नावे सांगू, त्याचं काय झालं. तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, पोलिसांना कसलीचा माहिती नाही, सरकार झोपलेलं आहे आणि बाहेरच्या राज्यातील पोलीस येऊन ही कारवाई करतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -