घरमुंबईपालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले; ५ वेळा जाणवले धक्के

पालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले; ५ वेळा जाणवले धक्के

Subscribe

भूकंपाचे सतत धक्के बसत असल्यामुळे नागरिक घरामध्ये राहत नाही तर संपूर्ण रात्र घराबाहेर काढत आहे.

पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यापासून भूकंपाची मालिका सुरुच आहे. आज पहाटेपासून चार ते पाच वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील धुंदलवाडी, डहाणी आणि तलासरीमधील नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. डहाणू, तलासरी भागामध्ये आज पहाटे ३.५४ वाजता आणि ४.५६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यांनतर सकाळी १०.४४ वाजता आणि ११.२० वाजता पुन्हा दोन धक्के बसल्याची माहिती मिळाली. या भूकंपाची तिव्रता ३.१ रिश्टर स्केल ऐवढी नोंद करण्यात आली आहे.

संपूर्ण रात्र घराबाहेर

गेल्या आठवड्यात डहाणू, तलासरी आणि धुंदलवाडीमध्ये एकाच दिवशी सलग चार वेळा भूकंपाचे हादरे बसले होते. या भूकंपाच्या धक्क्या दरम्यान, पळताना दगडावर डोकं आपटून एका २ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. भूकंपाचे सतत धक्के बसत असल्यामुळे नागरिक घरामध्ये राहत नाही तर संपूर्ण रात्र घराबाहेर काढतात. त्याचसोबत भूकंप होत असल्यामुळे छावण्या उभारण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

शिवसेनेकडून मदतीचा हात

दरम्यान, सरकारचा मदतीचा हात तोकडा पडत असताना शिवसेना भूकंपग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. शिवसेनेकडून हळदपाडा आणि परिसरात नागरिकांसाठी छावण्या उभारायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ही करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी सरकारची मदत कमी पडेल त्या ठिकाणी शिवसेना मदत करेल असे मत राज्याचे मंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

पालघर जिल्हा भूकंपाने हादरला; स्थानिकांमध्ये भीती

भूकंपाच्या भीतीने थंडीतही झोपतात घराबाहेर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -