घरदेश-विदेशअलिगढ मुस्लिम विद्यापीठाला छावणीचे स्वरुप; १४ विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला छावणीचे स्वरुप; १४ विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Subscribe

मंगळवारी विद्यापीठात मोठा गदारोळ झाला होता. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात देशविरोधी घोषणाबाजी दिल्या होत्या. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, त्यामुळे विद्यापीठाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सध्या विद्यापीठातील परिस्थिती चिंताजनक आहे. मंगळवारी विद्यापीठामध्ये मोठा गदारोळ झाला होता. काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळी. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीत नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. या घटनेनंतर विद्यापीठातील सर्व कार्यक्रम पुढील २४ तासांसाठी खंडीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर परिसरातील इंटरनेट सेवाही खंडीत करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १४ विद्यार्थ्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेने मंगळवारी सामाजिक शास्त्र विभागाच्या कॉनफरन्स हॉलमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या परिसंवादाचे आयोजन केले होते. यासाठी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ओवेसींच्या कार्यक्रमाला काही लोकांनी जोरदार विरोध केला. विद्यार्थी नेता अजय सिंहला दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांनी मारहाण केली. त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली. या घटनेदरम्यान, विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी फिरुन कथीत स्वरुपात देशविरोधी घोषणाबाजी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानाच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केल्या आहेत. पोलिसांना या विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीचा एक व्हिडिओ मिळाला आहे. त्यावरुन पोलिसांनी १४ विद्यार्थ्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर अलिगढच्या पोलीस अधिक्षकांनी सांगितले की, ‘विद्यापीठातील वातावरण बिघाडणाऱ्यांची ओळख पटली असून यातील ५६ विद्यार्थ्यांवर याअगोदरही गुन्हे गाखल झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अटक करण्यासाठी कोर्टाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आला आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -