घरताज्या घडामोडीमंत्रालयातून उडी मारणाऱ्या महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शिक्षण मंत्र्यांकडून कौतुक

मंत्रालयातून उडी मारणाऱ्या महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शिक्षण मंत्र्यांकडून कौतुक

Subscribe

सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रूपा मोरे या मध्यमवयीन महिलेने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या सोबत तिचे दोन मुलं होती. सायन येथील त्यांच्या एसआरए इमारतीतील घराबाबतच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे.

Mumbai : मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला शालेय शिक्षण मंत्री कार्यालयातील कर्मचारी विजय डुबल आणि सागर मिरगळ यांनी प्रसंगावधान दाखवून वाचवले. या दोघांच्या धाडसी कृत्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो, असे सांगून शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दोघांचे कौतुक आणि मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

वैयक्तिक कारणास्तव रूपा मोरे या सोमवारी मंत्रालयात आल्या होत्या. तिसऱ्या मजल्यावर असताना त्यांनी अचानक खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. याच मजल्यावर शालेय शिक्षण मंत्र्यांचे कार्यालय आहे. या कार्यालयातील कर्मचारी डुबल आणि मिरगळ यांनी प्रसंगावधान दाखवत मोरे यांना उडी मारण्यापासून प्रवृत्त करत रोखल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांच्या या प्रसंगावधानाचे मंत्रालयात कौतुक होत आहे.

- Advertisement -

सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रूपा मोरे या मध्यमवयीन महिलेने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या सोबत तिचे दोन मुलं होती. सायन येथील त्यांच्या एसआरए इमारतीतील घराबाबतच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे.  मात्र खाली उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या रूपा मोरे यांना कार्यालयातील कर्मचारी डुबल आणि मिरगळ रोखले. त्यानंतर  मोरे यांना  मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.


हेही वाचा – मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांना मिळणार चालना, MMRDA च्या अर्थसंकल्पास मंजूरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -