घरताज्या घडामोडीमुंबई महानगरातील पायाभूत सुविधांना मिळणार चालना, MMRDA च्या अर्थसंकल्पास मंजूरी

मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांना मिळणार चालना, MMRDA च्या अर्थसंकल्पास मंजूरी

Subscribe

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आज (सोमवार) बैठक पार पडली. यामध्ये राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाची १५२ वी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये मुंबईसह आणि इतर विविध प्रकल्प, योजनांना संमती देण्यात आली आहे. या बैठकीमध्ये नवीन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या निधीचा गोषवारा मांडणारा सन २०२१-२२ च्या सुधारीत अंदाजपत्रकास आणि सन २०२२-२३ च्या मूळ अर्थसंकल्पास मंजूरी देण्यास आली आहे. सन २०२१-२२ च्या सुधारीत अर्थसंकल्पानुसार एकूण उत्पन्न ८ हजार ६७२ कोटी जमा होणार असून १४,५८८.०२ कोटी इतका खर्च होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

या प्रकल्पांचा असणार समावेश

सन २०२२-२३ च्या मूळ अंदाजपत्रकात एकूण १०,७२४ कोटी जमा होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये नरिमन पॉईंट ते कुलाबा/ कफ परेडला जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर मेट्रो मार्गिका १०,११ आणि १२ पूर्व मुक्त मार्गाचे ठाण्यापर्यंत विस्तारीकरण्यात येणार आहे.

- Advertisement -

ठाणे खाडी किनारी मार्ग, ठाणे शहरातील आनंद नगर ते खारेगाव उन्नत मार्ग, कल्याण बाह्य वळण रस्ता, कोपरी पटणी रस्ता, गोराई खाडीवरील पूल, ठाणे-बोरीवली लिंकरोड वरील भूयारी मार्ग आदि. प्रकल्पांचा समावेश असून नवीन प्रकल्पांकरीता २१११.३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उर्वरीत बहुतांश रक्कमेची तरतूद ही प्रामुख्याने विविध मेट्रो मार्ग तसेच मुंबई पारबंदर मेट्रो मार्गासारख्या प्रकल्पांचा समावेश असणार आहे.

रायगड जिल्ह्यांमध्ये मुंबई पारबंदर मेट्रो प्रकल्प ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग असा थेट जोडरस्ता आणि चिर्ले येथील उर्वरित आंतरबदलाचे तसेच सेवा रस्त्याची कामे करण्यासाठीच्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : एकनाथ शिंदेंनी वाचून दाखवल्या शासन दरबारी मान्य लेखी मागण्या, संभाजीराजे छत्रपती यांच्या लढ्याला यश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -