घरमुंबईदिवसा फेरीवाले आणि रात्री सामानांमुळे पदपथावर अतिक्रमण

दिवसा फेरीवाले आणि रात्री सामानांमुळे पदपथावर अतिक्रमण

Subscribe

फेरीवाल्यांचे सामान व्यावसायाच्याठिकाणीच ठेवले जाते बांधून

मुंबईतील फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीकोनातून पावले उचलली जात असली तरी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक मोहिम महापालिकेच्या माध्यमातून रावबली जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना हटवतानाच त्यांना पदपथावर कुठही जागा अडवण्याच्यादृष्टीकोनातून सामान ठेवू नये. तसेच सामान असल्यास त्यावर कारवाई करावी,असे तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांचे स्पष्ट निर्देश असतानाही याकडे अधिकार्‍यांचे आता दुर्लक्ष होत आहे. महापालिका अधिकार्‍यांच्या या दुर्लक्षामुळे पदपथांवर फेरीवाल्यांचे सामान व्यावसायाच्या ठिकाणी बांधून ठेवले जात आहे. परिणामी याचा त्रास पादचार्‍यांना सहन करावा लागत आहे.

मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधा कारवाई हाती घेतानाच कुठल्याही फेरीवाल्यांकडून पदपथ अडवला जाईल,अशाप्रकारे व्यावसायाच्या ठिकाणी बाकड्यांसह सामान बांधून ठेवले जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दोन वर्षांपूर्वी दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या प्रत्येक विभागाच्यावतीने फेरीवार्‍यांविरोधात धडक कारवाई हाती घेतानाच पदपथावर बांधून ठेवलेल्या सामान जप्त करण्यात यावे. याबाबत विशेष मोहिम हाती घेण्याचे आदेशच आयुक्तांनी दिल्यांनतर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी याविरोधात कारवाई हाती घेतली होती. परंतु अजोय मेहता महापालिकेतून जाताच महापालिकेच्या अधिकार्‍यांनी फेरीवाल्यांकडे तसेच त्यांनी पदपथ अडवून ठेवलेल्या सामानांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

सध्या माटुंगा पश्चिम येथील रेल्वे स्थानक मार्ग असलेल्या टि.एच.कटारिया मार्गावरील रहदारीच्या पदपथावरच मोठ्याप्रमाणात फेरीवाले पथारी पसरवून बसले असून ते आपले सर्व सामान व्यावसायाच्याठिकाणी बांधून ठेवत आहेत. परंतु जी/उत्तर विभागाच्यावतीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. रात्रीच्यावेळी कारवाई मोहिम हाती घेत पदपथावरील हे साहित्य जप्त करणे आवश्यक असताना, त्याकडे कानाडोळा करण्याचे काम महापालिकेचे अधिकारी करत आहे. माहिमधील टि.एच.कटारिया मार्गासह मुंबईतील अनेक रस्त्यांवरील पदपथ अशाप्रकारे दिवसा व्यावसाय करत तर रात्री सामान बांधून अडवले जात आहेत.

यासंदर्भात अतिक्रमण विभागाचे उपायुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना पदपथावर व्यावसाय करण्यास परवानगी नाही. तिथे व्यावसायाच्या ठिकाणी सामान बांधून ठेवण्याची परवानगी तर नाहीच नाही. त्यामुळे अशाप्रकारे जर कोणी फेरीवाले रस्त्यांवर व्यावसायाचे सामान बांधून ठेवत असतील तर त्यांच्याविरोधात महापालिकेच्या माध्यमातून धडक कारवाई केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -