घरमुंबईअभियांत्रिकी प्रवेशाची माहितीपुस्तिका आता मराठीत

अभियांत्रिकी प्रवेशाची माहितीपुस्तिका आता मराठीत

Subscribe

विद्यार्थी, पालकांना माहिती मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून सीईटी सेलचा निर्णय

बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी शाखेकडे असतो. त्यासाठी एमएचटी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक असते. परीक्षेनंतर प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांकडून इंग्रजीमधील माहितीपुस्तिका वाचण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्यांना कागदपत्रे जमा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे माहितीपुस्तिकेतील माहिती विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही कळावी यासाठी यंदापासून अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशाची माहितीपुस्तिका मराठीमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य सामाईक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल)घेण्यात आला आहे.

एमएचटी-सीईटी परीक्षेच्या माध्यमातून दरवर्षी अभियांत्रिकी शाखेचे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. एमएचटी सीईटीच्या परीक्षेला नोंदणी करणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाईन इंग्रजी माहितीपुस्तिका अर्जासोबत उपलब्ध करून दिली जाते. परंतु बहुतांश विद्यार्थी ही माहितीपुस्तिका वरचेवर वाचतात. त्यामुळे कट ऑफ लिस्ट जाहीर झाल्यानंतर कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मुदत, प्रवेश घेण्याची मुदत याकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होते. परिणामी विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना माहितीपुस्तिका वाचता यावी यासाठी यंदापासून आता इंग्रजीसह मराठीमध्येही माहितीपुस्तिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे. मराठीमधून माहितीपुस्तिका उपलब्ध झाल्यास विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडूनही ती वाचण्यात येईल व ऐनवेळी विद्यार्थी व पालकांची होणारी धावपळ रोखणे शक्य होईल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -