घरमुंबईजुहू समुद्रातील खडकांवर 'शेवाळ'; पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

जुहू समुद्रातील खडकांवर ‘शेवाळ’; पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Subscribe

जुहू समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर शेवाळ आलं आहे.मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर असं शेवाळ फारसं पाहिलं जात नाही. त्यामुळे यामागील कारण शोधलं असता, बाजुला कोस्टल रोडचं काम सुरू असल्यानं तिथलं पाणी हे प्रक्रिया न करता, समुद्रात सोडलं गेल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबईचा सर्वात लांब समुद्रकिनारा जुहू समुद्रकिनारा हा भारतातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. मुंबईतील एक मोठं आकर्षण म्हणजे जुहू बीच. हे बीच पर्यटकांमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. जुहू समुद्रकिनारा हा शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य तसेच स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. जिथे अनेकदा लोक आपल्या जोडीदारासह किंवा कुटुंबातील सदस्यांसह, मित्रपरिवारासह गर्दीपासून दूर एकांतात वेळ घालवण्यासाठी येतात. जुहू समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर बसून गप्पा रंगलेल्या आपण पाहिल्या आहेत. आता या खडकांवर शेवाळ आलं आहे. (Environmentalists expressed concern on Juhu Beach Algae)

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर असं शेवाळ फारसं पाहिलं जात नाही. त्यामुळे यामागील कारण शोधलं असता, बाजुला कोस्टल रोडचं काम सुरू असल्यानं तिथलं पाणी हे प्रक्रिया न करता, समुद्रात सोडलं गेल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रदूषित पाणी समुद्रात गेल्यानं खडकांवर शेवाळ आल्याचं काही समुद्रअभ्यासकांचं म्हणणं आहे. समुद्रात शेवाळ येणं हे खूप दुर्मिळ असल्यानं पर्यावरणतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

शेवाळ हे केवळ प्रदूषित सांडपाणी समुद्रात सोडल्यानं येत नाही, तर ते नैसर्गिकरित्या वाढतं. त्यामुळे प्रत्येकवेळी सांडपाण्यामुळे शेवाळ वाढेल, असं म्हणता येत नाही, असं प्रदुषण नियंत्रण मंडळानं सांगितलं आहे.

तर काही तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवाळ हे एक अन्नसाखळीचा भाग आहे. समुद्रात शेवाळ येत, त्यानंतर खेकडे, मासे अशी साखळी असते,असं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच, समुद्री शेवाळ हे सूर्याकडून ऊर्जा तर समुद्रातील पाण्याकडून पोषणतत्व आणि कार्बनडाय ऑक्साईड मिळवतात. समुद्री शेवाळ ग्लोबल वॉर्मिंगशी लढण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. तसंच कार्बन उत्सर्जनाची भरपाई करू शकतात, असंही तज्ज्ञ सांगतात.

- Advertisement -

कोस्टल रोडचं काम सुरू 

कोस्टल रोडचं 76 टक्के काम पूर्ण झालेलं आहे. 2023 च्या अखेरपर्यंत हा रोड पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या कोस्टल रोड कामाच्या अंतर्गत समुद्रातील सागरी जिवांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. पालिकेने आतापर्यंत केलेल्या कोस्टल रोडच्या कामांचे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशिनोग्राफिने निरीक्षण करून एक अहवाल तयार केला असून त्यामध्ये, कोस्टल रोडवर समुद्राच्या बाजूने लावलेल्या महाकाय दगडांमध्ये सागरी जीव वाढत असून त्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आल्याचे समजते. आगामी काळात दहा ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ‘आर्टिफिशीअल रीफ’ही बसवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -