घरमुंबईअखेर विद्यापीठात फडकला तिरंगा

अखेर विद्यापीठात फडकला तिरंगा

Subscribe

ध्वजस्तंभ उभारल्यानंतर तब्बल १० महिन्यांनी झाले ध्वजारोहण

विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी व देशामध्ये विद्यापीठाचे वेगळे स्थान निर्माण व्हावे यासाठी कलिना कॅम्पसमध्ये तब्बल 150 फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता. मात्र तब्बल 10 महिन्यांपासून यावर तिरंगाच फडकवण्यात आला नव्हता. यासंदर्भात दैनिक ‘आपलं महानगर’मध्ये ‘विद्यापीठाला राष्ट्रध्वजाचा विसर’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या विद्यापीठ प्रशासनाने तातडीने 12 नोव्हेंबर रोजी ध्वजस्तंभावर तिरंगा फडकवला.

मुंबई विद्यापीठाला 160 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 18 जुलै 2016 मध्ये कलिना कॅम्पसमध्ये 150 फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला. त्यावर 30 बाय 50 फूट अशा भव्य आकाराचा तिरंगा 24 तास सुरुवातीचे काही महिने फडकत होता. परंतु 10 महिन्यांपासून या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वजच फडकला नाही. यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनीही विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात येत नव्हती. यासंदर्भात दैनिक ‘आपलं महानगर’ने 11 नोव्हेंबरला ‘विद्यापीठाला राष्ट्रध्वजाचा विसर’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. ही बातमी प्रसिद्ध होताच विद्यापीठ प्रशासनाने तातडीने सोमवारी सकाळीच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकवला आहे. यासंदर्भात विद्यापीठाचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवत होतो. काही दिवसांपूर्वी तिरंगा खराब झाल्याने आम्ही धुण्यासाठी तो काढला होता. परंतु आता आम्ही पुन्हा ध्वजारोहण केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

10 महिन्यांपासून ध्वजस्तंभावर तिरंगा फडकवण्यात येत नव्हता. ही माहिती चुकीची आहे. आम्ही अधूनमधून तिरंगा धुण्यासाठी तिरंगा काढत असतो.
– विनोद माळाळे, उपकुलसचिव, जनसंपर्क, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -