घरमुंबईमटका किंग रतन खत्री यांचे ८८ व्या वर्षी निधन, मुंबईत घेतला अखेरचा...

मटका किंग रतन खत्री यांचे ८८ व्या वर्षी निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

Subscribe

रतन खत्री यांचा धंदा लोकप्रिय झाला आणि लोकं त्यांना मटका किंग म्हणून ओळखू लागले

मटका किंग रतन खत्री यांचे शनिवारी सकाळी निधन झाले आहे. मुंबईतील नवजीन सोसायटीतील राहत्या घरी त्यांनी ८८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. १९६०च्या काळात त्यांनी कल्याण भगत यांच्यासोबत मुंबईत मटक्याचा धंदा सुरू केला होता. १९६० च्या दशकात खत्री यांनी कल्याण भगत यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, सुरूवातीच्या काळात खत्री भगत यांच्या धंद्यात मॅनेजर म्हणून रुजू झाले होते.  १९६४ मध्ये खत्री यांनी भगतपासून वेगळे होऊन स्वत:चा रतन मटका सुरू केला. त्यावेळी त्यांचा धंदा लोकप्रिय झाला आणि लोकं त्यांना मटका किंग म्हणून ओळखू लागले. १९६० च्या दशकात मटका हा मुंबईतील सर्वच वर्गात लोकप्रिय होता.

- Advertisement -

मागील अनेक दशकांपासून आणि आजही मटका अनेकांचा आवडीचा धंदा आहे. खत्री यांच्या जाण्याने सट्टा किंवा मटका क्षेत्रात दुःख व्यक्त होत आहे. मटका किंवा एका भांड्यात चिट्सवरून चिठ्ठी काढणे इतके प्रसिद्ध झाले की त्या काळात जुगाराची उलाढाल दररोज १ कोटी रुपयांच्या घरात असायची. हा खेळ स्वातंत्र्यांच्या पूर्वीपासूनच मुंबईत प्रसिद्ध आहे. यात न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजमधून कापसाचे दरवाजे उघडणे व बंद करणे यावर पैसे लावले जायचे.


Corona: भायखळा तुरुंगातही ‘कोरोना’चा शिरकाव; ५४ वर्षीय महिला कैदी पॉझिटिव्ह!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -