घरमुंबईCorona: भायखळा तुरुंगातही 'कोरोना'चा शिरकाव; ५४ वर्षीय महिला कैदी पॉझिटिव्ह!

Corona: भायखळा तुरुंगातही ‘कोरोना’चा शिरकाव; ५४ वर्षीय महिला कैदी पॉझिटिव्ह!

Subscribe

भायखळा तुरुंगात महिला कैदीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

मुंबईतील भायखळा तुरुंगातील ५४ वर्षीय महिला कैदीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. महिला कैदीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून या तुरुंगात आढळलेला हा पहिला कोरोना रुग्ण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कैदीचे ८ मे रोजी पहिली कोरोना चाचणी करण्यात आली होती. स्वॅबचे नमुने घेतल्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र पुन्हा ९ मे रोजी त्या महिलेची कोरोनाची चाचणी केल्यानंतर घेतलेल्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. या महिलेला श्वास घेताना त्रास होऊ लागल्याने तिला आता सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती भायखळा तुरुंगाच्या व्यवस्थापनाने दिली आहे.

- Advertisement -
ऑर्थर रोडनंतर आता भायखळा तुरुंगात शिरकाव

दरम्यान, मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता भायखळा तुरूंगात कोरोनाने शिरकाव केला असून ही महिला कोरोनाचा पहिलाच रूग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातील ७२ कैदी आणि ७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ७२ कैद्यांना जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


तुरुंगातल्या कैद्यांची तपासणी करण्याचे आदेश
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -