घरमुंबईठाण्यात ग्रामीण भागातील महिलांनी तयार केल्या गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन

ठाण्यात ग्रामीण भागातील महिलांनी तयार केल्या गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन

Subscribe

शहापूर-मुरबाडच्या आदिवासी-ग्रामीण भागातील महिलांनी हस्तकलेतून निर्मिती केलेल्या उबदार-नक्षीदार गोधड्या, दिवाळी साहित्य आणि इतर गृहपयोगी वस्तूच्या विक्रीसाठी ठाणे जिल्हा परिषद आवारात प्रदर्शन आयोजन करण्यात आले

शहापूर-मुरबाडच्या आदिवासी-ग्रामीण भागातील महिलांनी हस्तकलेतून निर्मिती केलेल्या उबदार-नक्षीदार गोधड्या, दिवाळी साहित्य आणि इतर गृहपयोगी वस्तूच्या विक्रीसाठी ठाणे जिल्हा परिषद आवारात प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी शुक्रवारी या प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनातील महिलांशी संवाद साधला. त्यांच्या हस्तकलेचे कौतुक केले. शिवाय काही वस्तू देखिल खरेदी केल्या. महिलांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, मुख्य लेखा व वित्तधिकारी गीता नागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता) छायादेवी शिसोदे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे, जिल्हा कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे, पेसा समन्वयक मीनल बाणे, कर्वे संस्थेच्या स्नेहल नाईक आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

पंचायत क्षेत्र विस्तार कायदा १९९६ (PESA Act) अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड या आदिवासी भागातील बचत गट व ग्रामस्त यांनी तयार केलेले मोहफुलांचे लाडू, नाचणी सत्व, महिलांनी तयार केलेल्या उबदार गोधडी, मातीचे दिवे, नाचणी सत्व, खुरासणी चटणी, सेनेटरी नॅपकीन, मध इ. विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीच्या उद्देशाने जिल्हा परिषद, ठाणे परिसरामध्ये जिल्हा परिषद, ठाणे व कर्वे इंस्टीटयूड ऑफ सोशल सर्वीसेस, पुणे तसेच वननिकेतन संस्था, ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. ठाणे यांचे मार्गदर्शनाने आयोजन करणेत आले.

हेही वाचा –

जनतेने भाजपला खरा महाजनादेश दाखवला – नवाब मलिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -