घरमुंबईशिवसेनेच्या आमदारांना हवंय मुख्यमंत्रीपद; उद्या बैठक

शिवसेनेच्या आमदारांना हवंय मुख्यमंत्रीपद; उद्या बैठक

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या दुपारी १२ वाजता मातोश्री निवासस्थानी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी सर्व नवनिर्वाचीत आमदारांचा कल जाणून घेण्यात येणार आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काल स्पष्ट झाले. त्यानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तेव्हा मुख्यमंत्रीपद शिवसेनेलाच मिळावे अशी मागणी शिवसेनेचे नवनिर्वाचीत आमदारांची इच्छा आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या दुपारी १२ वाजता मातोश्री निवासस्थानी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी सर्व नवनिर्वाचीत आमदारांचा कल जाणून घेण्यात येणार आहे.

१४५ चा आकडा गाठण्यासाठी साथ महत्वाची

काल लागलेल्या निवडणुकीच्या निकालानुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीला मतदारांनी पसंती दर्शवली आहे. यामध्ये भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला १४५ हा बहुमताचा आकडा पार करावा लागणार आहे. पण त्यासाठी भाजपला शिवसेनेच्या साथीची आवश्यकता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एकनाथ शिंदे अखेर बॅकफूटवर?

बैठकीत या गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता

उद्या मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत महत्वाच्या गोष्टींवर चर्चा हण्याची शक्यता आहे. या बैठकीत नवनिर्वाचीत आमदारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी पुढील रणनितीबाबत त्यांच्याशी चर्चासुद्धा होईल. सत्तेतील शिवसेनेच्या भूमिकेपासून शिवसेनेला समान वाटा मिळावा याबाबतची चर्चा यावेळी होईल. विशेष म्हणजे, पहिली अडीच वर्षं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावं, त्याचबरोबर महत्वाच्या खात्यांचे समसमान वाटप व्हावे, यासाठी शिवसेनेने ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -