घरमहाराष्ट्रजनतेने भाजपला खरा महाजनादेश दाखवला - नवाब मलिक

जनतेने भाजपला खरा महाजनादेश दाखवला – नवाब मलिक

Subscribe

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आज नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

भाजप सरकारला जनतेने खरा महाजनादेश दाखवला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी भाजपावर केली. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आज नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. तसेच या सरकारचा जनतेने सत्तेचा माज उतरवला असून, मोदी शाह जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांचे उमेदवार पडले, अशी टीका देखील त्यांनी केली. ‘कार्यकर्त्यांना वाटत होते की आता मोदी आले की जादूची कांडी फिरवेल मात्र मोदी लाट ओसरली आहे. तरुणांना रोजगार नाही, शेतकरी हवालदिल, पूरग्रस्तांना मदत नाही यामध्ये सरकार कुठेच दिसले नाही म्हणून त्यांचा पराभव झाला’, असे देखील मलिक म्हणाले. तसेच ‘हे सरकार आधीपासूनच अकार्यक्षम होते फक्त जाहिरातीच्या माध्यमातून आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता’, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा – लांबलेल्या पावसाने उदयनराजेंचा बळी घेतला – जितेंद्र आव्हाड

- Advertisement -

भाजप-शिवसेना कार्यालयात शुकशुकाट

दरम्यान, युतीला बहुमत मिळाले असले तरी त्यांच्या कार्यालयांमध्ये मात्र शुकशुकाट असल्याची टीका देखील मलिक यांनी केली. तसेच आम्हाला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला तरी आमच्यात उत्साह आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील एक जल्लोष असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर सध्या वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत पण पवार साहेबांनी स्पष्ट केले की राष्ट्रवादीला विरोधात बसण्याचा कौल जनतेने दिला आहे. एक प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणूनच आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी स्पस्ट केले.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांची भावनिक पोस्ट; ‘संघर्षातून उभे राहिलो, हक्कांसाठी लढत राहू’

- Advertisement -

…म्हणून राजे कॉलर ताईट करून भाजपात गेले

उदयनराजे यांनी मंत्री असताना स्वतःचे नाव ७-१२ मध्ये टाकून जागा लाटल्या आणि त्या भ्रष्टाचारापासून वाचण्यासाठी ते कॉलर टाईट करून भाजपात गेल्याची टीका नवाब मलिक यांनी करत जयदत्तही शिवसेनेत गेले. मात्र लोकांनी फोडाफोडीचे राजकारण नाकारल्याची त्यांनी टीका केली.

चुना भट्टीचा ब्रिज रविवारी खोलणार

दरम्यान, लोकांना ट्राफिकचा प्रचंड त्रास होत होता म्हणून चुनाभट्टी ते बिकेसी असा ब्रिज आम्ही मंजूर करून घेतला होता. मात्र आज ब्रिज पूर्ण होऊन दीड महिना झाला तरी उद्घाटन केले जात नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नाही म्हणून चालढकल केली जात असल्याचे त्यांनी सगीतले. त्यामुळे रविवारी सकाळी ११ वाजता आम्ही तो ब्रिज जनतेसाठी खुला करणार. जनतेने या सोहळ्यात आपलाही सहभागही नोंदवावा असे सांगत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -