घरताज्या घडामोडीउल्हासनगरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आढळली मुदत संपलेली इंजेक्शनं!

उल्हासनगरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आढळली मुदत संपलेली इंजेक्शनं!

Subscribe

ठेकेदाराने क्षयरोगावरील एक्सपायरी डेटच्या इंजेक्शनचा साठा उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाला दिला आहे .स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. याबाबत त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला आहे. मात्र हा बॉक्स बाजूला ठेवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

कॅनॅमाईसीनहे इंजेक्शन क्षयरोगावर उपायकारक असल्याने ते रुग्णांना देण्यात येते. 3 जून 2020 ला  ठेकेदाराने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात इंजेक्शनचा साठा दिला. हे इंजेक्शन जुलै 2017 मध्ये तयार करण्यात आले असून जून 2019 मध्ये त्यांची एक्सपायरी डेट होती. असे असताना 3 जून 2020 रोजी हे इंजेक्शने शासकीय रुग्णालयात देण्यात आली आहेत.

- Advertisement -

हा धक्कादायक प्रकार समजताच स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी उल्हासनगर पालिका आयुक्त समीर उन्हाळे, शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुधाकर देशमुख, पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर यांच्याकडे इंजेक्शने पुरवणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे. उपजिल्हा चिकित्सक डॉ. जाफर तडवी यांना जाब विचारला असता, हा बॉक्स आम्ही बाजूला ठेवलेला असून त्याच्यातील इंजेक्शनांचा वापर केला नसल्याची माहिती दिली. सुदैवाने हा बॉक्स बाजूला ठेवण्यात आल्याची कबूली डॉ. जाफर तडवी यांनी दिल्याने पुढील अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया राजेश वधारिया यांनी दिली.

- Advertisement -

हे ही वाचा – गोव्यात जाताय? तर मग आधी हे नवीन नियम वाचा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -