घरCORONA UPDATEगोव्यात जाताय? तर मग आधी हे नवीन नियम वाचा!

गोव्यात जाताय? तर मग आधी हे नवीन नियम वाचा!

Subscribe

कोरोनामुक्त झालेलं राज्य म्हणजे गोवा. पण मजुरांच्या स्थलांतराच्या परावनगी नंतर पुन्हा गोव्यात कोरोनाचे रूग्ण आढळायला सुरूवात झाली. त्यामुळे पुन्हा एकदा गोव्याची चिंता वाढली. त्यातच आता गोव्यात नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची चाचणी केली जाणार नाहीये. राज्यातून आणि राज्याबाहेरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

“जवळपास २५०० जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट येणे बाकी आहेत. आम्ही दिवसला दीड ते दोन हजार चाचण्या करत असून त्या कायम असणार आहेत. पण राज्यात प्रवेश कऱणाऱ्यांसाठी आम्हाला कार्यप्रणालीत बदल करणं गरजेचं आहे,” अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिवसभर बैठका सुरु होत्या. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.  “नव्या नियमावलीनुसार, राज्या प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्कॅनिंग केलं जाणार आहे. विमानतळं, रेल्वे स्थानकं, रस्त्यांवर हे स्कॅनर लावण्यात येणार आहेत. जर एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणं आढळली तर त्याची चाचणी करणं अनिवार्य असणार आहे, १० जूनपासून नवे नियम लागू होणार आहेत.

- Advertisement -

गोव्यात येणाऱ्या व्यक्तीला १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात येईल. त्यांच्या सर्व हालचालींवर स्थानिक प्रतनिधींकडून लक्ष ठेवण्यात येईल. जर एखाद्या व्यक्तीला घरी जायचं नसेल तर त्याच्यासाठी संस्थात्मक क्वारंटाइनचा पर्यायही आहे. त्यासाठी शुल्क मोजावे लागेल. तिसरा पर्याय म्हणजे जर एखादी व्यक्ती फक्त काही दिवसांसाठी राज्यात येत असेल तर दोन हजार रुपयांत कोरोनाचा चाचणी करु शकतो,” असे ते पुढे बोलताना म्हणाले.


हे ही वाचा – अमानुषपणाची हद्द! हत्तीणीनंतर कुत्र्याचा छळ,टेप करकचून बांधली तोंडाला!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -