घरमुंबईपोलिसाच्या गणवेशात खंडणी मागणारे गजाआड

पोलिसाच्या गणवेशात खंडणी मागणारे गजाआड

Subscribe

पोलिसांचे गणवेश घालून एका व्यावसायिकाला धमकावीत त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांचे गणवेश घालून एका व्यावसायिकाला धमकावीत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघा खंडणीखोरांना सोमवारी रात्री ठाणे खंडणी विरोधी पथकाने रंगेहाथ अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. परेश पाटील, अभिजीत उतेकर, धनाजी दळवी आणि समीर वाडवेली अशी अटक केलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लायटर असलेले बनावट पिस्तूल, दोन बेड्या, पोलिसांचा गणवेश जप्त केला आहे.

नोकराच्या सतर्कतेमुळे बनावट पोलिसांचे बिंग फुटले

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एका खाद्यपदार्थाच्या दुकानातून परेश पाटील याने मोमोज घेतले. त्या मोमोजमध्ये स्टेपलरची पिन आढळून आली. त्यानंतर तक्रार घेऊन परेशसह चौघेजण पोलिसाच्या गणवेशात दुकानात शिरले. त्यांनी स्टेपलरची पीन आढळल्याचा जाब विचारीत दुकानातील एका नोकराला बेड्या घालून धमकावत गुन्हा दाखल करू नये यासाठी व्यापाऱ्याकडे २० हजार रूपयांची मागणी केली. मात्र, दुकानातील एका नोकराला या पोलिसांवर संशय आला. त्याने आपल्याशी परिचित नौपाडा पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याशी संपर्क साधला. त्याला हा प्रकार सांगितला. काही वेळातच नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या बनावट पोलिसांचे बिंग फुटले. पोलिसांनी चौघांच्याही मुसक्या आवळल्या असून, त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या गणवेशात आतापर्यंत कोणा कोणाकडे खंडणी मागितली याचा पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – खर्‍या पोलिसांकडून तोतया पोलीस गजाआड


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -