घरमुंबईमंत्रालयाच्या गेटवर आंदोलन, शेतकऱ्यांना अटक

मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन, शेतकऱ्यांना अटक

Subscribe

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे, छावा युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर हे आंदोलन केले.

मंत्रालयाच्या गेटसमोर विशिष्ट मागण्यांसाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे किंवा आंदोलनं करणे हे प्रकार अनेकदा घडले आहेत. अशाचप्रकारचे एक आंदोलन आज मंत्रालयाच्या गेटसमोर पहायला मिळाले. आपल्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. छावा युवा संघटनेच्या वतीने आज मंत्रालयाच्या गेटसमोर हे आंदोलन करण्यात आले असून, आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपलब्ध माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या एकूण ६० कार्यकर्त्यांमध्ये १० महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची या शेतकऱ्यांसोबत १५ दिवसांपूर्वी बैठक झाली होती. मात्र, त्यानंतर खोत यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे छावा युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या गेटसमोर उभे राहत तूर, हरभरा, मूग उधळत सरकारचा निषेध केला. दरम्यान या घटनेनंतर आता मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी सुरू असून, संशय येणाऱ्या व्यक्तींची थेट धरपकड केल्याची माहिती मिळत आहे. हे आंदोलन छावा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.


वाचा : हायटेक इंग्रजी शेतकरी, वार्षिक उत्पन्न ६ कोटी

आंदोनलात अटक झालेले शेतकरी :

  • धनाजी येळकर
  • राजेंद्र देवकर
  • ज्ञानेश्वर लोभे
  • सदाशिव लोभे
  • रुपाली पाटील
  • नाना फुगे

वाचा : शेतकरी दाम्पत्याने घातले जिवंतपणी श्राद्ध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -